About this book
या पुस्तकाविषयी
परकीय अन्नमदतीचे दोर तोडून टाकण्यासाठी 'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री० ग० माजगावकर यानी 'अन्नस्वतंत्रतासंचलना'चा उपक्रम हाती घेतला होता. 'कैलास ते सिंधुसागर' म्हणजे वेरूळ ते मुंबई अशा या दोन महिने चाललेल्या सुमारे साडेतीनशे मैलांच्या प्रवासातील अनुभवांचे दि० बा० मोकाशींनी केलेले हे कथन. या छोट्या पायी प्रवासाविषयी मोकाशींनी म्हटले आहे : त्यांचा हा प्रवास "अज्ञात मनांवरून झाला.
या अज्ञात मनांवरून जात असता, उभे राहणारे दुराग्रहांचे पर्वतकडे, ओसाड मनांचे वालुकामय प्रदेश, अज्ञानाच्या दऱ्या, वादावादीची अरण्ये आणि पक्षोपक्षांचे हिंस्र पशु खात्रीने कमी भयानक, कमी दुर्धर किंवा कमी अघटित नव्हते."
मराठी प्रवासवर्णनांत 'पदयात्रा' या प्रकाराची लक्षणीय भर घालणाऱ्या 'अठरा लक्ष पावलं'ची ही दुसरी आवृत्तीही वाचकांना स्वागतार्ह वाटेल !
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं