भूमी

Bhoomi

लेखक Asha Bage | आशा बगे
प्रकाशक
Mouj Prakashan Gruh
भाषा
मराठी

₹५००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

ही आहे मैथिलीची भूमी. वाल्मीकींनी जिला मर्यादापुरुषोत्तम रामाच्या पुरुषी संकुचित दृष्टीतून रेखली, त्या मयदितच अडकून न राहणाऱ्या अशा एका आधुनिक मैथिलीची वडिलांच्या मृत्यूनंतर तामिळी खिश्चन आईच्या संस्कारांत वाढलेली, समुद्रकिनारी वसलेल्या लहानशा गावातली ही मैथिली तिच आयुष्य आईच्या मृत्यूनंतर मुंबईत आत्याकडे आल्यावर अनेक वळणांतून सरकत राहतं. पण आयुष्यातला प्रत्येक अनुभव तिला तिच्यातील अंतःस्थ स्वत्वाची जाणीव देत, कधी त्याच्याशीही संघर्ष करत, घडवत नेतो-एका अनाथ, हट्टी मुलीच एका बुद्धिवान, समंजस नि आत्मसार्थ्यांच्या बळावर आयुष्याला समजून घेणाऱ्या एका प्रगल्भ स्त्रीमध्ये रुपांतर करत, स्वतः मधल्या सर्जकशक्तीने स्वत ला उजळत नेणाऱ्या या मैथिलीच्या भूमीचे हे पाझर म्हणजे तिच्या स्वत्वाचेही हुकार आशा बगे मराठी साहित्यक्षेत्रात अनेक वर्ष स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या लेखिकांमधील एक ठळक नाव. 'झुंबर', 'त्रिदल', 'सेतू' अशा अविस्मरणीय कादंबऱ्यानंतरची त्यांची ही कादबरी एकीकडे पारंपारिकतेशी नाळ न तोडताही आधुनिक जीवन-विचारसरणीला सामोरं जाता येत.. हे वैशिष्ट्य जाणवून देणारं आशा बगे यांचं लेखन नागपूरसारख्या शहरातील वास्तव्यामुळे वैदर्भीय भाषेचा आतरिक गोडवा त्यांच्या भाषेत झिरपलेला जाणवतो, अनेक पातळ्यांवरून सांधत, विस्कळत जाणारी मानवी भावबंधांची उत्कट, जिवंत स्पंदन हा त्यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष. या वैशिष्ट्यांनी साकारलेली ही 'भूमी', अंतर्मुखतेचाही एक दुर्मीळ आनंद वाचकांना प्रदान करत राहते.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like