About this book
या पुस्तकाविषयी
प्रत्येक व्यक्तीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हितावह असतो का? गरीब राष्ट्रांमधून आलेले स्थलांतरित स्थानिक लोकांच्या रोजगारावर पायबंद घालतात का? जगभर सर्वत्र आर्थिक विषमतेचा विस्फोट का होत आहे? साधनसंपत्तीच्या फेरवाटपामुळे माणसाच्या मनातील काम करण्याच्या प्रेरणांची पायमल्ली होते का? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रसाराचा आनंद मानावा की त्याची काळजी करावी? हवामानबदल आणि आर्थिक विकास या दोन गोष्टींमध्ये आपण संतुलन कसे राखायला हवे ? पाश्चिमात्य देशांत बापुढे आर्थिक विकास होणारच नाही का? त्याची आपण चिंता करायला हवी आहे का?
आपल्यासमोर असलेल्या ज्वलंत आर्थिक समस्या कशा प्रकारे हाताळायला हव्यात हे आज एक मोठे आव्हान आहे. अंतराळातील प्रवास कसा करावा यापेक्षा किंवा कॅन्सरसारख्या रोगावर मात कशी करावी, या समस्यांना भिडण्याच्या आव्हानापेक्षा हे आव्हान गंभीर स्वरूपाचे आहे. कारण या सर्व आर्थिक समस्यांमुळे चांगल्या दर्जाच्या आयुष्याची कल्पनाच पणाला लागली आहे. कदाचित उदारमतवादी लोकशाहीही पणाला लागली असेल. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे साधनसंपत्ती आहे; पण आज आपल्यामधे मोठ्ठी दरी पडली आहे. आपसातील मतभेदांची आणि परस्पर अविश्वासाची उंच भिंत ओलांडण्याइतकी मोठी झेप घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कल्पनांची आपल्याकडे वानवा आहे. या समस्येचे उत्तर शोधण्यास आपण मनापासून भिडलो, जगभरातील सहृदय, सर्वोत्तम माणसे विविध देशांच्या सरकारांसाठी काम करू लागली आणि समाजही या दृष्टीने विचार करू लागला तर हे शक्य होईल. सार्वजनिक उपक्रम अधिक परिणामकारक व्हावे आणि राजकीयरीत्या व्यवहार्य व्हावेत अशा रीतीने त्यांची पुनर्रचना करण्याचा आपण प्रयत्न केला तर इतिहास या युगाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करेल.
या क्रांतिकारी पुस्तकात अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो या एमआयटी संस्थेतील मान्यवर अर्थतज्ज्ञांनी हे आव्हान पत्करले आहे. जगभरात अर्थशाखात झालेल्या अद्ययावत संशोधनाच्या आधारावर त्यांनी त्यांचे विचार रसाळ भाषेत मांडले आहेत. हे विचार मूलगामी, जिज्ञासा वाढवणारे आणि प्रश्नांची निकड स्पष्ट करणारे आहेत. बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशाख या पुस्तकात त्यांनी परस्पर सामंजस्य व आदर यांवर उभारलेली समाजव्यवस्था घडविण्यासाठी अर्थव्यवस्थेत हुशारीने कोणत्या प्रकारचे हस्तक्षेप करणे गरजेचे आहे हे मांडले आहे. ज्या जगात आपण जगत आहोत ते किती अनिश्चिततेवर उभारलेले आहे याची जाणीव आपल्याला हे असामान्य पुस्तक करून देते.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं