इरफान खान

IRFAN KHAN

प्रकाशक
Madhushree Publication
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२२०
ISBN
9788119812158
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

एक अभिनेता... ज्याचे डोळे जणू अनेक कथांचा अथांग सागर आहेत... इरफान खान हा तरल मनाचा स्वप्नं बघणारा अभिनेता होता. समोरच्याला आपल्या त्या खास नजरेत कैद करून टाकण्याची जादू त्याच्या डोळ्यांत होती. अचंबित करून टाकेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं आणि अभिनयाची कारकिर्द देदीप्यमान ! आपण त्याला मुख्यतः ओळखतो, ते त्याने आपल्या अभिनयातून अजरामर केलेल्या भूमिकांमुळेच ! मग तो 'द नेमसेक' मधला अशोक असेल, 'मकबूल' असेल, 'पिकू' मधला राणा किंवा 'द लंचबॉक्स' मधला सज्जन असेल... आणि अर्थातच 'हैदर' मधला रूहदार - या भूमिका विसरणं शक्य नाही. इरफानने ही सगळी पात्रं रुपेरी पडद्यावर जिवंत केली. या भूमिकांमुळे त्याचं नाव जगभर गाजलं. 'इरफान खानः प्रवास एका अभिनेत्याचा' हे पुस्तक सर्वांपेक्षा वेगळ्या आणि चौकटी मोडून आपल्या अभिनयाला वेगळे आयाम देणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याचा प्रवास आपल्यासमोर उलगडतं. अत्यंत शिस्तबद्धपणे अभ्यास करून या अभिनेत्यासंदर्भातले अनेक बारकावे आपल्याला सांगतं. लेखक असीम छाब्रा यांनी या पुस्तकाचं लेखन करताना अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. सिनेसृष्टीतले अनेक जण इरफानविषयी बोलले आहेत. त्यातून लेखकाने इरफानच्या व्यक्तिगत आणि कलाजीवनाचा साकल्याने शोध घेतला आहे. प्रासादिक शैलीतलं आणि अनेक किस्से सांगणारं हे पुस्तक या अभिनेत्याचा राजस्थानमधल्या लहानशा घरातून सुरू झालेला आणि थेट हॉलीवूडपर्यंत पोहोचलेला थक्क करणारा प्रबास वाचकांसमोर मांडते. इरफानच्या काही महत्त्वाच्या भूमिकांचा, त्याच्या अभिनयशैलीचा मागोवा घेत हे पुस्तक आपल्याला सिनेमा ही काय चिज आहे, सिनेमा काय करू शकतो याविषयी सांगतं. अर्थात, या कथनाचा केंद्रबिंदू आहे त्याच्या पिढीमधला सर्वोत्तम अभिनेता असणारा एक माणूस, अभिनय या कलेविषयीची त्याची तळमळ आणि अनोख्या भूमिकांविषयी त्याचं निरतिशय प्रेम हेच !

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

असीम छाब्रा | Aseem Chhabra

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like