मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ खंड दुसरा

Mardhekaranchi Kavita Swaroop Ani Sandarbh Khand Dusara

प्रकाशक
Mouj Prakashan Gruh
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

बाळ सीताराम मर्डेकर हे आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील श्रेष्ठ व युगप्रवर्तक नवकवी होत. त्यांच्या कवितेमध्ये, भिन्न भिन्न पिढ्यांच्या व काव्यविषयक भूमिकांच्या समीक्षकांना समाधान व आव्हान-दोन्ही देण्याचे सामर्थ्य आहे. मर्देकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ हा डॉ० विजया राजाध्यक्ष यांचा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे मर्देकरांच्या कवितेचा संशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास होय. मर्देकरांच्या कवितेच्या अंतरंगातील आशयाचा व त्याच्या आविष्काराच्या रूपाचा निखळ शोध पहिल्या खंडात घेतल्यानंतर या दुसऱ्या खंडात, मर्देकरांचे चरित्र व व्यक्तिमत्त्व, तसेच त्यांची काव्येतर ललितनिर्मिती व समीक्षालेखन आणि त्यांच्या कवितेमागे उभ्या असलेल्या देशी व विदेशी काव्यपरंपरा या तीन संदर्भात मर्देकरांच्या कवितेचा विचार केला आहे. अभ्यासाची ही दिशा अस्पर्शित, नव्या स्वरूपाची आहे. मर्देकरांशी अखंड, निरंतर असे नाते जडलेल्या डॉ० विजया राजाध्यक्ष यांची जातिवंत रसिकता व गाढ व्यासंग यांचा आणि आस्वादक व विश्लेषक समीक्षादृष्टी यांचा विरळा संयोग येथे पाहायला मिळतो. रसिकाची संवेदनाशक्ती समृद्ध करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या 'साहित्य अकादमी' पुरस्कारप्राप्त ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती होय. - प्रा० मीना गोखले
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

विजया राजाध्यक्ष | Vijaya Rajadhyaksha

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like