arrow_back Back to Books
मुल्यभानाची सामग्री

मुल्यभानाची सामग्री

Mulyabhanachi Samagri

storefront Shabd Publication
qr_code ISBN: 9789382364566
calendar_today 2016
menu_book 427 pages
₹450
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

...म्हणूनच संस्कृतीमध्ये लिंगभाव येतों. श्रेणिभावाच्या, वंशश्रेष्ठत्वाच्या, मानाच्या, डौलाच्या, अस्मितेच्या संकल्पना येतात. फॅशन येते. सौदर्याविषयीच्या संकल्पना येतात. स्तुतिसुमने वाहण्याच्या पद्धती येतात. शिव्याही येतात. शिक्षणाच्या पद्धती येतात. इतिहासाची अर्थनिर्णयने येतात. नीती अनितीच्या कल्पना येतात. विश्वास येतात. रुढी येतात. उत्सव येतात आणि दैनंदिन जगण्यातल्या नमस्कार करण्यापासून कचरा करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टीही येतात.


संस्कृतीमुळे आपल्या जगण्यातील अर्थपूर्णता निर्माण होते आणि संस्कृतीमुळे माणसांना अंध करणारी नियंत्रणेही घातली जातात. संस्कृती घडवली जाते. रचली जाते. तिच्या जडणघडणीमागे सत्तेचे, उत्पादनाचे, शोषणाचे, अन्यायाचे संबंध असतात. व्यवहारांच्या पृष्ठस्तरावर ते येऊ नयेत याची काळजी संस्कृतीकडून घेतली जात असते. दडपणे आणि दडवणे ही संस्कृतीचे पद्धतिशास्त्र असते. रंगसफेदी करण्यासाठी संस्कृतीचा बेमालूमपणे उपयोग होत असतो. ती लोकभावनांचे अनुकूलन करून घेते आणि सत्तेचे हितसंबंध जपते. संस्कृती म्हणजे अखेरीस सांगाड्यावर चढवलेला डोळे दिपवणारा मुलामा असतो. संस्कृती क्लोरोफॉर्मसारखे काम करते. ती बेहोषी आणते. झिंग आणते. ती शोषणाचे साधन ठरते. उत्पादन आणि सामाजिक संबंधांचे राजकारण या दोन्ही गोष्टी संस्कृतीमध्ये एकात्म होत असतात. पण त्यांचे अस्तित्व प्रथमदर्शनी जाणवत नाही. म्हणूनच तिची सतत चिकित्सा करत राहावी लागते.


- मूल्यभानाची सामग्री मधून

Book Images

About the Author

person

Dr. Harishchandra Thorat | डॉ. हरिश्चंद्र थोरात

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like