About this book
या पुस्तकाविषयी
वतनदार घराण्यातल्या एकाकी, संवेदनाशील स्रीच्या आंतरिक संघर्षाची कथा 'राहीच्या स्वप्नांचा उलगडा'मध्ये स्वप्नसदृश वास्तवाच्या भासातून तर कधी वास्तवसदृश स्वप्नानुभवातून उघडत जाते.
स्वप्न आणि वास्तव ही माध्यमे स्वतंत्रपणे इथे वास्तव्यास असतात प्रभाव दाखवतात तर कधी ती विलक्षणपणे परस्परांतून पार होत असताना जाणवतात. अशा स्थित्यंतरांतून जीवनातला जटिल, गूढ अनुभव आकलनशील स्तरावर स्थिरावत एखाद्या उत्कट कवितेसारखी राहीची कहाणी हृदयाचा ठाव घेते.
स्वतःची स्वतंत्र मुद्रा ज्यांच्या लेखनातून उमटत राहिलेली आहे अशा आजच्या नामवंत मराठी कथाकारांत भारत सासणे यांची गणना होते.
कादंबरीसारख्या वाङ्मयप्रकारातही त्यांची लेखनशक्ती किती समर्थपणे प्रकटते याचे दर्शन इथे घडेल.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं