या पुस्तकाविषयी
रंग सुखाचे... रंग सुखाचे कोणते ? योगी संत-महंत सांगतात, 'त्या ज्ञानियांच्या सुखाचा रंग शुभ्रधवल, रविकिरणांसारखा'! पण सर्वसामान्यांसाठी त्याच प्रखर शुभ्रतेतून सप्तरंगी इंद्रधनू साकारतं. सुखाचे रंग अनेक, छटा वेगवेगळ्या. माणसं आणि त्यांच्या सुखाच्या कल्पना जाणून घ्यायचं मला जणू वेडच लागलं. सुखाचे मिळाले ते रंग घेऊन कुणी आपलं जगणं इतकं सुंदर बनवलं होतं की, मला त्या माणसांत आगळा कलाकार दिसू लागला. तर काहींनी, 'हवे ते रंग' मिळूनही 'जगणं' कुरूप केलं होतं. सुखाचे वेगवेगळे रंग पाहून मी तर हरखून गेले, नादावले, रंगबाबरी झाले. वाटलं, हे सुखाचे रंग जरा जवळून पाहायला मिळाले तर... 'जगणं' रम्य होऊन जाईल. सुरेख साकारता येईल. शोधताशोधता कळलं - मानसशास्त्राच्या लोलकातून हे रंग नक्की पाहता येतील. तसे ते पाहिलेही. म्हटलं, याच विषयावर थोडं बोलावं, लिहावं. असं करताना सुखाच्या या रंगांची आणखी ओळख होईल. जगण्यातील एकमेकांच्या कलात्मकतेची, रसिकतेची सहजवृद्धी होईल; कारण हा विषय सर्वस्पर्शी आणि प्रत्येक जण आपल्यापरीने कलावंतच !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.