रीयुनियन

Reunion

प्रकाशक
Madhushree Publication
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

फ्रेड उल्मान : जर्मनीतील श्टुटगार्ट येथे जन्मलेल्या फ्रेड उल्मानला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वदेश सोडावा लागला. तो चित्रकार होता, कवी होता आणि उदरनिर्वाहासाठी कायद्याचे उच्चशिक्षणही त्याने घेतले होते. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होताचं दोनच महिन्यात त्याने देश सोडला. फ्रांस, स्पेन या देशांत नशीब आजमावत तो अखेर ब्रिटनमध्ये स्थिरावला. युद्धाला तोंड फुटल्यावर शत्रू राष्ट्राचा नागरिक म्हणून ब्रिटनने त्याला सहा महिने तुरुंगवासात टाकले. पण त्यानंतरचे त्याचे आयुष्य ब्रिटनमध्ये कलावंतांच्या सहवासात गेले. चित्रकार म्हणून तो ख्याती पावला. त्याची चित्रे ब्रिटनमधील अनेक संग्रहालयांत प्रदर्शित केलेली आहेत. रीयुनियन हि त्याची कांदबरिका प्रसिद्ध झाल्यावर दुर्लक्षित राहिली. परंतु मध्ये ती पुनः प्रकाशित झाली तेंव्हा ऑर्थर कोस्लरच्या नजरेत आली, आणि मग यशस्वी ठरली. रीयुनियन नाझी जर्मनीच्या त्या कालखंडाचा विचारही नकोसा वाटतो. त्याच कालखंडात घडते कॉन्राडिन आणि हॅन्स या दोन मित्रांच्या अधुऱ्या मैत्रीची गोष्ट. द्वेषपूर्ण राजकीय परिस्थितीतील जर्मनीमध्ये घडलेल्या आणि बिघडलेल्या या मैत्रीची कथा, बऱ्याच काळानंतर कधीतरी पुनर्भेट होऊन पूर्ण होते. एक आगळी, चटका लावणारी पुनर्भेट, फ्रेड उल्मानची ही नाजूक जिवाची कांदबरिका अनुवादित केली आहे डॉ. मुग्धा कर्णिक यांनी...
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

फ्रेड उल्मान | Fred Uhlman

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like