arrow_back Back to Books
साहित्य आणि अस्तित्वभान भाग - २

साहित्य आणि अस्तित्वभान भाग - २

Sahitya Ani Astitvabhan Bhag - 2

person Dilip Purushottam Chitre
qr_code ISBN: 9788194459002
menu_book 653 pages
₹1,000 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

प्रस्तुत ग्रंथाची जुळवाजुळव सुरू करण्याचे काम २००८ साली सुरू झाले. आता २०२२ मध्ये हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. म्हणजे हे कार्य सिद्धीस जाण्यास एकूण चौदा वर्षे लागली. चित्रे यांचे या ग्रंथातील लेखन खूप आधीचे आहे. ते अनेक ठिकाणी विखुरलेले, मिळविताना खूप अडचणी आलेल्या. त्याची पुन्हा पुन्हा जुळवणी, मांडणी करणे हे एकूण फारच जिकीरीचे आणि थकविणारे काम होते, जे सुमती लांडे यांनी अथक श्रम आणि जिद्द खेरीज दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या लेखनाविषयी आस्था आणि प्रेम यांच्या बळावर सिद्धीस नेले आहे. चित्रे यांच्या विविधांगी लेखनाची मौलिकता स्वयंस्पष्टच आहे. या दर्जाचे लेखन एकत्र येण्यास इतका वेळ जावा यात चित्रे यांची स्वतःच्या लेखनाविषयीची विरागी बेफिकिरी जशी दिसते तशीच मराठी समाजाची या दर्जाच्या विचारांविषयीची प्रच्छन्न अनास्थाही. हे लेखन एकत्रित स्वरूपात आले ही मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी उशिरा का होईना मिळालेली एक अमोल अशी देणगी होय. एक जागतिक दर्जाचा विचारवंत कवी आणि लेखक आपल्या भाषेत अगदी अलिकडेच होऊन गेला याची साक्ष देणारा हा ग्रंथ होय.

Book Images

About the Author

Dilip Purushottam Chitre

Dilip Purushottam Chitre

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like