तहानलेलं पाणी

Tahanlele Pani

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०१४
पृष्ठे
८८
ISBN
9789380617831
भाषा
मराठी

₹१२०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मारुती सावंत यांची कविता एका प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत असली तरीही ती देशातील कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा आक्रोश मांडत जाते. हे सर्व मांडताना कवितेच्या सौंदर्याला बाधा येऊ देत नाही. अनेक ठिकाणी चपखल उपमा, उत्प्रेक्षा, चेतनागुणोक्ती अलंकारांचा वापर करतांना दिसते. खरं तर अनुभवाचं मोठं व्यापक विश्व त्यांच्या जवळ आहे. हे त्यांची कविता अधोरेखित करून जाते. शेतात आणि समाजात रोज नवनवी तणं वाढताना, माजताना दिसतात. याची खंतही सावंतांच्या कवितेतून स्पष्ट होताना आढळते. तसेच सद्विचारांची जोपासना केल्यास सकारात्मक बदल होऊ शकतो. हा विश्वास त्यांची कविता देतांना दिसते. भुकेचा व पाण्याचा प्रश्न सोडवतांना होणारे गुंते अधिक त्रस्त करून टाकतात. एक गुंता सोडतांना दुसरे गुंते अधिक अधिक त्रस्त करून टाकतात. एक गुंता सोडतांना दुसरे गुंते अधिक वाढत जातात. याच गुंत्यात गुंतून इथला कुणबी संपतो आहे. गरिबी, दारिद्र्य, मुलांचे लग्न, दारुचे व्यसन, कर्जबाजारीपण, अवर्षण ही गुंत्याची काही महत्त्वाची ठिकाणे, त्याच्या आयुष्याच्या वाटेवर ठाण मांडून असतात. त्यांच्या गुंत्यात भलेभले गुरफटत जातात. याला कारणीभूत काहीसा निसर्ग जसा आहे, तशीच समाज व्यवस्था असल्याचे भाष्य सावंताची कविता करताना दिसते. त्यांची कविता कष्टकऱ्यांचा टाहो फोडतांना दिसते.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

मारुती भाऊराव सावंत | Maruti Bhaurao Sawant

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like