₹325
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
त्रिविधा
₹325
About This Book
त्रिविधा
मकरंद साठे
'त्रिविधा' तीन भिन्न साहित्यप्रकारांतील, भिन्न पात्रसमूह व भिन्न कथानके असलेल्या पण समान आशयसूत्रांनी जोडलेल्या संहितांचा समूह आहे. केवळ जागतिकीकरणानंतरच शक्य असेल अशी मानवी संबंधांची व्यामिश्र अवस्था 'त्रिविधा'मधून व्यक्त करताना कल्पितकथेचे अस्तित्व पणाला लावण्याचे धैर्य मकरंद साठे यांनी दाखविले आहे. मिध्यकथांचा उपयोग, कथानकाने घेतलेली अनपेक्षित वळणे, रचण्याच्या प्रक्रियेतील जाणीवपूर्वकता सतत उघडी पाडणारी अधिकथनात्म भाष्ये आणि सकस वैचारिक गद्य यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामधून 'त्रिविधा' कथनाचे रूपांतर कथ्यामध्ये करते.
'त्रिविधा' इतकी समकालीन आहे की रशिया-युक्रेन युद्धात होणाऱ्या स्फोटांचे आवाज आणि भारतात होणाऱ्या मॉब लिंचिंगमधल्या किंकाळ्या तिच्या पानापानांतून ऐकू येतात. विनाशाच्या कडेलोटापर्यंत पोहोचलेले जग, त्यात उद्भवणारे अस्तित्वलक्ष्यी, सामाजिक आणि विशेषतः राजकीय गाभा असलेले प्रश्न 'त्रिविधा' मधून दचकवत पुढे येतात. द्वेष आणि हिंसा यांच्या ताणाखाली होणारी सामाजिक विघटनाची प्रक्रिया, त्यामुळे बिकट होत जाणारी अस्मितेची जडणघडण आणि परिणामतः अविवेकशील यादृच्छिकतेच्या हवाली होणारे मानवी आयुष्य 'त्रिविधा'मधून पुढे येते.
मानवी समूहाच्या प्रचंड मोठ्या पटावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हालचाली कवेत घेत समकालात उदयाला आलेले अवकाशांचे राजकारण 'त्रिविधा'च्या आशयसूत्रांच्या हाताळणीतून मूर्त होत जाते. पारध करण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावून ठेवले आहेत असे विविध अवकाश 'त्रिविधा' मधून साक्षात होतात. त्यांच्याशी संबादी असलेल्या सामाजिक संरचना, राजकीय संस्थांची भ्रष्ट होत जाणारी अस्तित्वे, मानवी आयुष्य नजरेच्या धाकात ठेवणाऱ्या यंत्रणा विकसित करणारी समकालीन भांडवलशाही अशी अनेक तथ्ये या आशयसूत्रांमधून 'त्रिविधा'मध्ये प्रवेश करतात.
अत्यंत अपवादात्मक अशी अवस्था कल्पून अत्यंत शांतपणे त्या अवस्थेची तात्त्विक परिमाणे शोधत मानवी संबंधांमधले राजकारण बारकाव्यांसह उभी करण्याची मकरंद साठे यांची क्षमता येथे अधिक व्यापक होते आहे. यामुळेच 'त्रिविधा'मधून एकीकडे समकालीन जगण्यातील द्वेष, हिंसा, भय, विनाश, युद्धमानता यांच्या ताण्याबाण्यांमधून निर्माण झालेले संस्कृतीचे पोत उलगडून दाखवले जाते, तर दुसरीकडे माणसाविषयीचा कारुण्यभाव काळोखातल्या काजव्यासारखा लुकलुकत राहतो.
- हरिश्चंद्र थोरात
Book Images
About the Author
Makarand Sathe
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review