सुचिता खल्लाळ लिखित आणि शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर प्रकाशित ‘डिळी’ ही गावखेडे आणि निमशहरी जीवनातील सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध आणि जगण्याच्या संघर्षाचे प्रगल्भ चित्रण करणारी कादंबरी आहे. श्रीरामपूर येथे आयोजित पुस्तकवारी उपक्रमात या कादंबरीचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी कादंबरीतील ग्रामीण आणि निमशहरी जीवनाच्या मांडणीचे विशेष कौतुक केले. गावातील जातिधर्माच्या पलीकडचा एकोपा, मतपेटीच्या राजकारणामुळे सामान्य माणसांच्या जीवनावर होणारे परिणाम आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून शहरात स्थिर झालेल्या व्यक्तींच्या वेगळ्या सामाजिक व मानसिक समस्यांचा लेखिकेने अत्यंत सक्षमपणे वेध घेतला आहे.

कादंबरीतील ‘गोदू’ ही व्यक्तिरेखा या कथानकाचे भावनिक केंद्र आहे. ‘डिळी’ म्हणजे खांब किंवा मेढ—आणि कुटुंबाचा आधार बनून जगणारी गोदू या अर्थाला जिवंत करते. आपल्या मुलांचे आणि संसाराचे अस्तित्व टिकवण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार न मानणाऱ्या या ग्रामीण स्त्रीची जिजीविषा कादंबरीला विलक्षण सामाजिक आणि भावनिक ताकद देते. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या मते, वाचकाला अस्वस्थ करून वास्तवाकडे नव्याने पाहण्यास भाग पाडणारी ही कादंबरी आहे.

सुचिता खल्लाळ या समकालीन मराठीतील महत्त्वाच्या कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांच्या ‘पायपोळ’, ‘तहहयात’, ‘प्रलयानंतरची तळटीप’ या कवितासंग्रहांसह ‘स्त्री कवितेचे भान : काल आणि आज’ हा समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कवितांना महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, दक्षिण मराठी साहित्य परिषद तसेच इतर मानांकित साहित्यिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे डिळी ही त्यांच्या साहित्यप्रवासातील एक महत्त्वाची कादंबरी ठरते.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याची माहिती

पुस्तकाचे: नाव डिळी

लेखिका :सुचिता खल्लाळ

साहित्यप्रकार: कादंबरी

प्रकाशक: शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर

प्रकाशन :उपक्रम पुस्तकवारी

प्रकाशन: स्थळ श्रीरामपूर

प्रमुख उपस्थिती / भाष्य ज्येष्ठ: साहित्यिक रंगनाथ पठारे

प्रकाशक प्रतिनिधी: ज्येष्ठ कवयित्री-साहित्यिक सुमती लांडे

व्यवस्थापक: सुमित लांडे

कादंबरीचे प्रमुख विषय: गावखेडे, निमशहरी जीवन, सामाजिक विषमता, जातिधर्मापलीकडचा एकोपा, राजकारण, स्त्रीजीवन, स्थलांतर, शिक्षण आणि जगण्याचा संघर्ष

मुख्य व्यक्तिरेखा: गोदू

‘डिळी’चा अर्थ खांब / मेढ — कुटुंबाला आधार देणाऱ्या स्त्रीचे प्रतीक

मुखपृष्ठ :चंद्रमोहन कुलकर्णी

अभिनंदन करणारे मान्यवर: निळकंठ कदम, आशुतोष पोतदार, कविता ननवरे, पृथ्वीराज तौर, योगिनी सातारकर, स्नेहलता स्वामी आदी

“Dili”, written by Suchita Khallal and published by Shabdalaya Prakashan, Shrirampur, is a powerful Marathi novel exploring the realities of rural and semi-urban life, social relationships and the struggle for survival. The novel was launched during the Pustakwari literary initiative in Shrirampur. Senior Marathi writer Ranganath Pathare praised the novel for its mature portrayal of village life, social unity beyond caste and religion, the impact of electoral politics on ordinary people, and the different challenges faced by those who move from rural roots into educated, urban or semi-urban lives.

At the emotional centre of the novel is Gotu, a rural mother whose life reflects resilience, sacrifice and extraordinary determination. The word Dili refers to a supporting post or pillar, and Godu symbolically becomes that pillar for her family. Even while facing severe hardship, she refuses to surrender, making the novel both deeply moving and socially significant. According to Ranganath Pathare, the novel has the power to awaken readers and make them confront uncomfortable realities of contemporary society.

Suchita Khallal is also an established Marathi poet and critic. Her published works include the poetry collections “Paypol,” “Tahhayat,” “Pralayanantarchi Talatip” and the critical work “Stri Kaviteche Bhan: Kal Ani Aaj.” Her poetry has received recognition from the Maharashtra Sahitya Parishad, Marathwada Sahitya Parishad, Dakshin Marathi Sahitya