पुस्तक प्रकाशन सोहळा – कार्यक्रमाचा संक्षिप्त परिचय
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर यांच्या वतीने लेखिका निमा बोडखे लिखित ‘रोसा – एक संघर्ष’ या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. साहित्य, सामाजिक जाणिवा आणि संघर्षमय जीवनप्रवासाची कथा मांडणाऱ्या या कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे तपशील:
- पुस्तक: रोसा – एक संघर्ष
- लेखिका: निमा बोडखे
- आयोजक: शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
- अध्यक्ष: डॉ. रवींद्र शोभणे – अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन, अमळनेर
- प्रकाशन शुभहस्ते: डॉ. लीना निकम – लेखिका व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित
- प्रमुख उपस्थिती: अरुंधती वैद्य – ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक
- प्रमुख उपस्थिती: पराग मगर – वरिष्ठ पत्रकार, तरुण भारत
- सूत्रसंचालन: अरुणा भोंडे
- दिनांक: मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६
- वेळ: सायं. ५.०० वाजता
- स्थळ: महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, अंबाझरी रोड, वोक्हार्ट हॉस्पिटल इमारतीमागे, शंकर नगर, नागपूर.
‘रोसा – एक संघर्ष’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे शब्दालय प्रकाशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
पुस्तक Shabdalaya.com तसेच Amazon वर उपलब्ध आहे.
मानवी स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं एक क्रांतिकारक नाव म्हणजे रोसा पार्क्स! अमेरिकेतील अमानुष वर्णद्वेष, वंशवादी दडपशाही आणि काळ्या लोकांवरील अन्यायाच्या काळ्याकुट्ट व्यवस्थेला एका साध्या, पण बाणेदार नकाराने हादरा देणाऱ्या एका असामान्य स्त्रीची ही महागाथा. एका बसमधील त्या ऐतिहासिक नकाराने पेटलेली विद्रोहाची ठिणगी पुढे संपूर्ण अमेरिकेला ढवळून काढणाऱ्या मानवमुक्ती आंदोलनाचा प्रखर वणवा ठरली.
निमा बोडखे यांनी अत्यंत त्यंत अभ्यासू वृत्ती, संवेदनशील जाणीव आणि ओजस्वी लेखणीच्या बळावर रोसा पार्क्स यांचा हा थरारक संघर्षमय जीवनपट विलक्षण प्रभावीपणे शब्दबद्ध केला आहे. गरिबी, सातत्यपूर्ण अपमान आणि सामाजिक विषमता अनुभवत अन्यायाच्या बलाढ्य साम्राज्याला आव्हान देणाऱ्या या वीरांगनेचा प्रवास वाचकाला अंतर्मुख करतो. ही केवळ एका स्त्रीची आत्मकथा नसून शोषितांच्या हुंकाराचा आणि युगायुगांच्या विद्रोहाचा जाज्वल्य इतिहास आहे.
जिद्द, आत्मभान आणि परिवर्तनाच्या प्रखर ऊर्जेने भारलेली ही कादंबरी स्त्रीशक्तीची एक नवी व्याख्या अधोरेखित करते. मराठी साहित्यात वैश्विक आशयाला कवेत घेणारी, मानवी मूल्यांचा जयजयकार करणारी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देणारी ही कादंबरी एक कालजयी साहित्यकृती ठरते.
‘Rosa – Ek Sangharsh’ by Nima Bodkhe – A Powerful Marathi Novel on Rosa Parks, Freedom and Social Justice
‘Rosa – Ek Sangharsh’, the second novel by Nima Bodkhe, is being presented by Shabdalaya Prakashan, Shrirampur through a special book launch event in Nagpur. The novel brings together literature, social awareness and the inspiring life journey of Rosa Parks, whose courageous resistance became a defining symbol in the struggle against racial discrimination and injustice.
The book launch of ‘Rosa – Ek Sangharsh’ is scheduled for Tuesday, 8 September 2026 at 5:00 PM at Maharashtra Rashtrabhasha Sabha, Ambazari Road, Shankar Nagar, Nagpur.
The event will be chaired by Dr. Ravindra Shobhane, President of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, Amalner. The book will be released by Dr. Leena Nikam, an author and recipient of a Presidential Award. Senior writer and critic Arundhati Vaidya and Parag Magar, senior journalist with Tarun Bharat, will be among the prominent guests. Aruna Bhonde will conduct the programme.
Shabdalaya Prakashan has invited literature lovers and readers to attend the launch and become part of this special literary gathering.
A Marathi Novel Inspired by the Extraordinary Life of Rosa Parks
At the heart of ‘Rosa – Ek Sangharsh’ by Nima Bodkhe is the remarkable story of Rosa Parks, a name deeply associated with human freedom, self-respect and social justice.
The novel presents the story of an ordinary yet extraordinarily courageous woman who challenged a deeply unjust system of racial discrimination, oppression and inequality in America through a simple but powerful act of refusal. That historic moment on a bus became a spark that grew into a much wider movement for human dignity and freedom.
Through extensive study, sensitivity and a forceful literary style, Nima Bodkhe recreates Rosa Parks’ difficult and inspiring journey for Marathi readers. The book explores poverty, repeated humiliation, social inequality and the courage required to stand against a powerful system of injustice.
Rather than presenting the story only as the life of one woman, the novel expands it into a broader account of resistance, dignity and the voice of the oppressed.
A Story of Courage, Womanhood and Transformation
‘Rosa – Ek Sangharsh’ is filled with determination, self-awareness and the energy of social transformation. The novel offers a powerful interpretation of women’s strength and resistance, while celebrating human values and the courage to challenge injustice.
By bringing the global story of Rosa Parks into Marathi literature, Nima Bodkhe’s novel connects readers with themes of civil rights, racial equality, women’s empowerment, human dignity and social change.
The book is available through Shabdalaya.com and Amazon, as stated in the supplied material.