arrow_back Back to Books
अजुनी या शहरात
Marathi Poetry

अजुनी या शहरात

Ajuni Ya Shaharat

person Meghana Bhuskute
₹265 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

काही केल्या कशावरच वा कुणावरच रेलता म्हणून येत नाही, तेव्हा कविता येते. आपल्याच सोबतीला आपणच जन्माला यावं, तशी माळावरच्या बाभळीसारखी वेडीवाकडी बेबंद उगवत जाते. शब्द भले की बुरे, जमलेले की न जमलेले, समकालीन की जडावलेले या सगळ्यांचे हिशेब नंतर होत राहतात. पण त्या-त्या वेळी कविता एक हक्काचं, जन्मजात, दिलखुश राजेपण बहाल करते. या इथे माझी सत्ता आहे, इथे मला टेकायला जागा आहे, इथून मला कुणी ऊठ म्हणणार नाही - अशी, ध्रुवबाळाच्या जातीची, निरंतर आश्वस्तता कविता देऊन जाते; तेव्हा मी रिकाम्या भरधाव ट्रेनच्या दारात उभी असते आणि पुढे क्षितिजापार पसरत जाणाऱ्या रुळांवरही माझंच राज्य असतं.

Book Images

About the Author

person

Meghana Bhuskute

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like