About this book
या पुस्तकाविषयी
जयंत नारळीकर नावाच्या एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत घराण्यात जन्मलेल्या असामान्य बुद्धिमान मुलाच्या कर्तृत्वाची ही कहाणी आहे-वेधक, उत्कंठावर्धक आणि गुंतवून ठेवणारी
तीव्र बुद्धिमत्ता हीच एकमेव कसोटी मानल्या जाणाऱ्या केब्रिज विद्यापीठात, बनारसला शिकणाऱ्या जयंत नारळीकर या मुलाला सहज प्रवेश मिळतो. अत्यत लहान वयात विज्ञानक्षेत्रातले जागतिक मान-सन्मान प्राप्त करत, जागतिक पातळीच्या वैज्ञानिकांत तो अग्रस्थान मिळवतो विज्ञानक्षेत्रात लौकिक यशाच्या अनेक वाटा खुणावत असतानाही संशोधनाची अवघड दिशा निवडण्याचे आव्हान पेलून दाखवत, विज्ञानप्रसाराच्या ध्येयाने झपाटून जातो.
पाश्चात्त्य देशांत अनेक प्रकारच्या व्यवसायांच्या संधी येऊनही निग्रहाने त्या ओलांडत, मायभूमीच्या मातीशी आपले जोडलेले घट्ट नाते ओळखत, भारतात पुन्हा परतलेल्या या अद्वितीय व्यक्तित्वाचा हा देदीप्यमान प्रवास भेटलेल्या असंख्य माणसांचा सहवास, कौटुंबिक जीवनाबरोबर पाश्चात्त्य सामाजिक-शैक्षणिक जीवन, गुरू, मित्र आदींबद्दलच्या आठवणी कथन करताना स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नितळ साधेपणा, विनम्रता आणि तितकीच अलिप्तता... वाचक म्हणून हे सगळे अनुभवताना या व्यक्तित्वाबद्दल पानोपानी अतीव आदर वाटत राहतो
मराठी वाङ्मयात एक ललित लेखक म्हणून स्वतंत्र स्थान असणाऱ्या जयंत नारळीकर यांची ओळख या आत्मकथनातून नव्याने उजळत जाते.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं