चार नगरांतले माझे विश्व

Char Nagarantale Maze Vishwa

प्रकाशक
Mouj Prakashan Gruh
भाषा
मराठी

₹८००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जयंत नारळीकर नावाच्या एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत घराण्यात जन्मलेल्या असामान्य बुद्धिमान मुलाच्या कर्तृत्वाची ही कहाणी आहे-वेधक, उत्कंठावर्धक आणि गुंतवून ठेवणारी तीव्र बुद्धिमत्ता हीच एकमेव कसोटी मानल्या जाणाऱ्या केब्रिज विद्यापीठात, बनारसला शिकणाऱ्या जयंत नारळीकर या मुलाला सहज प्रवेश मिळतो. अत्यत लहान वयात विज्ञानक्षेत्रातले जागतिक मान-सन्मान प्राप्त करत, जागतिक पातळीच्या वैज्ञानिकांत तो अग्रस्थान मिळवतो विज्ञानक्षेत्रात लौकिक यशाच्या अनेक वाटा खुणावत असतानाही संशोधनाची अवघड दिशा निवडण्याचे आव्हान पेलून दाखवत, विज्ञानप्रसाराच्या ध्येयाने झपाटून जातो. पाश्चात्त्य देशांत अनेक प्रकारच्या व्यवसायांच्या संधी येऊनही निग्रहाने त्या ओलांडत, मायभूमीच्या मातीशी आपले जोडलेले घट्ट नाते ओळखत, भारतात पुन्हा परतलेल्या या अद्वितीय व्यक्तित्वाचा हा देदीप्यमान प्रवास भेटलेल्या असंख्य माणसांचा सहवास, कौटुंबिक जीवनाबरोबर पाश्चात्त्य सामाजिक-शैक्षणिक जीवन, गुरू, मित्र आदींबद्दलच्या आठवणी कथन करताना स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नितळ साधेपणा, विनम्रता आणि तितकीच अलिप्तता... वाचक म्हणून हे सगळे अनुभवताना या व्यक्तित्वाबद्दल पानोपानी अतीव आदर वाटत राहतो मराठी वाङ्मयात एक ललित लेखक म्हणून स्वतंत्र स्थान असणाऱ्या जयंत नारळीकर यांची ओळख या आत्मकथनातून नव्याने उजळत जाते.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जयंत विष्णु नारळीकर | Jayant Vishnu Narlikar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like