arrow_back Back to Books
गेंड्याभुंग्याच्या पाठीवरून
Marathi Novel

गेंड्याभुंग्याच्या पाठीवरून

Gendya Bhungyachya Pathivarun

लेखक Jitendra Kuwar
storefront शब्दालय प्रकाशन
qr_code ISBN: 9789348054272
calendar_today 2026
menu_book 90 pages
layers First Edition
₹160
incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

जितेंद्र कुवर हे नव्या पिढीतील संवेदनशील कवी आणि बालसाहित्य लेखक आहेत. 'गेंड्याभुंग्याच्या पाठीवरून' ही त्यांची किशोरवयीन मुलांसाठीची अद्भुतरम्य कादंबरी आहे. अवाढव्य गेंड्याभुंगा स्वप्नात, बापू आणि त्याच्या मित्रांना आपल्या पाठीवर बसवून परग्रहाची सफर घडवून आणतो. लेखकाच्या कल्पनेतून साकारलेलं तिथलं सृष्टीचक्र चित्तथरारक घटना आणि प्रसंगांनी ओतप्रोत भरलेलं आहे. तिथले पशू, पक्षी, झाडं, नदी, डोंगर आणि प्राणी हे पृथ्वीवर दिसतात तसेच पण आकार, रंग आणि वर्तनानं वेगळे आहेत. लेखकानं मानवी स्वभाव-वर्तनाचं त्यांच्यावर केलेलं आरोपण थक्क करणारं आहे. काल्पनिक विश्वातील ही कादंबरी मनोरंजनाबरोबरच मुलांमधील भौगोलिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणविषयक जाणीवा विकसीत करणारी आहे. अफाट निरीक्षणसामर्थ्य आणि कल्पकता यातून पशु, पक्षी, प्राणी यांच्या चमत्कारीक वर्तनाचं नेमक्या शब्दात चित्रण करण्यात लेखक कमालीचे यशस्वी झालेले आहेत. कादंबरीतील मुलं प्राणीरुपी व्यक्तींना नुसतं लांबून बघत नाहीत तर त्यांच्या सहवासात राहून त्यांच्यात एकरूप होऊन जातात. गेंड्याभुंग्यासह हे पशु, पक्षी, प्राणी मुलांशी बोलतात, त्यांच्या मनातलं ओळखतात, मुलांनी मनात ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त केलेली असते ती त्यांना ते मिळवून देतात. भय, आश्चर्य, जिज्ञासा आणि कल्पनेपलीकडील गुढता यातून लेखकाच्या विलक्षण प्रतिभासामर्थ्यांचा जागोजागी प्रत्यय येतो. भाषेतील गोडवा, सांगण्याची शैली आणि विषयाच्या नाविन्यामुळे गेंड्याभुंग्याच्या पाठीवरुन ही कादंबरी मराठी बालसाहित्यात अत्यंत वेगळी आणि महत्वाची ठरावी अशीच आहे. अशोक कोतवाल 

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like