हिमालयाची सावली

Himalayachi Sawali

प्रकाशक
Popular Prakashan
प्रकाशन वर्ष
१९७२
पृष्ठे
११५
ISBN
9788171857074
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

हिमालयाची सावली वसन्त कानेटकर "...या नव्या नाटकात तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला हे फार बरे झाले. वाईट आणि चांगले यांच्या संघषपिक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष अधिक नाजूक असतो. तो रंगविणेही कठीण असते. पण मराठी कथा, नाटक, कादंबरी यांनी आता या वाटा चोखाळल्या पाहिजेत. असे नाटक आपोआपच उत्कट स्वभावनिष्ठ होते. त्यामुळे नाट्याचा कृत्रिमपणा कमी होतो. ड्रिंकवॉटर, शेरवुड वगैरेंच्या लिंकनबरल्या नाटकांत हा अनुभव मी घेतला आहे. या नाटकाच्या अनुषंगाने सुचलेला एक विचार मी तुमच्यापुढे मांडतो. चरित्रात्मक नाट्य किंवा कादंबरी लिहिणे ही एक प्रकारची कसरत आहे. मूळची माणसे घेतली की कल्पिताला, रचनाकौशल्याला आणि संस्कारसामर्थ्याला मर्यादा पडतात. तुम्ही नावे, माणसांची नाती, व्यबसाय इत्यादी गोष्टी बदलल्या आहेत. तरी तेवढ्याने फार मोठा बदल घडून येत नाही. मूळच्या माणसाच्या संबंधितांच्या हळव्या भावनांना अकारण जपावे लागते. अशा वेळी ज्या चरित्रापासून आपल्याला आशयसंपन्न विषय मिळत असेल त्याचा आत्मा तेवढा कायम ठेवून बाकीचे सारे मूळ चरित्रापासून दूर नेणे अधिक हितकारक होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर काहीही असो. वृद्ध नायक व नायिका यांच्याभोवती गुंफलेली कथानके आपल्याकडे फार थोडी असतात. त्या दृष्टीने तुमचे नाटक एक नवीन पायंडा घालीत आहे. रामचंद्रांची सीता आणि तुकारामाची जिजाई यांचे मिश्रण असलेली नायिका सुदैवाने तुम्हांला लाभलेली आहे. तिचे चित्रण तुम्ही फार कौशल्याने केले आहे..." - वि. स. खांडेकर

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

वसन्त कानेटकर | Vasant Kanetkar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like