सांस्कृतिक राजकारण : काही पैलू, काही आविष्कार
Sanskritik Rajkaran : Kahi Pailu, Kahi Avishkar
सांस्कृतिक राजकारण : काही पैलू, काही आविष्कार
₹460
About This Book
संस्कृती बहुपदरी असते, प्रवाही असते. जोवर तिच्यात कुठलेही राजकीय, आर्थिक, सामाजिक वा सांस्कृतिक अर्थाच्या वर्चस्वाचे हस्तक्षेप नसतात तोवर ती वाहती राहते. ती प्रदेश, भाषा, जीवनशैली, सामाजिक चालीरीती, सामाजिक उतरंड, जात, धर्म, पंथ, संप्रदाय अशा अनेक गोष्टींनी युक्त असते. भारतीय पातळीवर संस्कृतीचा विचार करताना ती जातीय उतरंडीवर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्थेत बंदिस्त असल्याने तिचे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असे थेट समाजशास्त्रीय विभाजन होते. कारण पिढ्यानुपिढ्या ब्राह्मण समाजाची ज्ञानाच्या तसेच सांस्कृतिक प्रभुत्वाच्या सर्व क्षेत्रांवर मक्तेदारी होती. ती आजही आहे. भोवतालचं राजकीय, सामाजिक किंवा सर्व प्रकारचं पर्यावरण लक्षात घेतलं तरीही ते ध्यानी येईल. तर अब्राह्मणी समाजाचं सांस्कृतिक स्थान हे ब्राह्मणी मान्यतेनुसारच अस्तित्वात येत होतं.
Book Images
Reviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review