About this book
या पुस्तकाविषयी
ॲरिस्टॉटल या विचारवंताने साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले आहे. ॲरिस्टॉटलच्या या विधानाची प्रचिती 'साहित्यबंध' हे पुस्तक वाचताना येते. आजच्या जागतिकीकरणातही वाङ्मयनिष्ठा जोपासणाऱ्या व वृद्धिंगत करणाऱ्या लेखकांत वाढ होत आहे. या लेखकांजवळ असणारे साहित्याविषयीचे आत्मभान अचंबित करणारे आहे. वर्तमानातल्या प्रश्नांना भिडण्याचे व या प्रश्नांचे सखोल चिंतन करणारे लेखनबळ त्यांच्या कलाकृतीतून जाणवते. सामाजिक मूल्यभान अधोरेखित करून मानवी जगण्याचा शोध घेण्याचं काम ही लेखक मंडळी करताना दिसून येतात. मानवी भाव-भावनांचे विविध पैलू व जगण्यातील नैतिकता हरवू न देणाऱ्या या लेखकांच्या कलाकृतीची आशयघन चर्चा व साहित्य चिंतन डॉ. सतीश कामत यांच्या 'साहित्यबंध' या पुस्तकात अनुभवता येते. नाटक, कथा, कविता, प्रवासवर्णन या वाङ्मय प्रकारांची संरचना, घटक आणि वैशिष्ट्याची मांडणी 'साहित्यबंध' मध्ये आहे. हा 'साहित्यबंध' वाचणाऱ्यांना व लिहिणाऱ्यांना अधिक जवळ आणेल, यात शंका नाही.
- डॉ. धनाजी गुरव
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं