Anuvad

See more images

Anuvad

अनुवाद

लेखक Asha Bage | आशा बगे
Publisher
Mouj Prakashan Gruh
Language
Marathi

₹225

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

आशा बगे यांच्या अलीकडील काही वर्षांतील निवडक कथांचा हा संग्रह. कथा या प्रकाराकडून कादंबरी वाड्मय प्रकाराकडे वळलेल्या आशा बगे यांचा हा संग्रह त्यांची कथा-आजही अम्लान आहे याची साक्ष देणारा. सूक्ष्म अनुभवांना चिमटीत पकडून त्या अनुभवांचं अथांगपण उत्कटपणे मांडणारी यातली प्रत्येक कथा... आधुनिक काळाच्या-आजच्या बदलत्या संक्रमणाच्या संदर्भात मानवी जीवनावरचा, नात्यांवरचा, संगीतादी अभिजात कलांवरचा आपला विश्वास अभंगच ठेवते. विविध कथांतील अनुभवांची रूपं कुटुंबाच्या चौकटीतली असूनही प्रत्येक कथा काळापलीकडील कथा ठरते, हे त्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य. मानवी परस्परसंबंधांचे, माणसांच्या तार्किक अतार्किक वर्तणुकीचे, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या ताणतणावांचे चित्रण आशा बगे यांची कथा विविध पातळ्यांवरून मांडते आणि इतक्याशा वाटणाऱ्या अनुभवाला प्रगल्भकरून टाकते. कधी आध्यात्मिक पातळीवरचा अमूर्त पण व्यापक अन्वयार्थही त्यांच्या कथांतून व्यक्त होतो, तेव्हा त्यांच्या कथेची ताकद मनाला स्पर्शत राहते... आशा बगे यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या या टप्यावरचा हा सकस कथासंग्रह अनेक अर्थानी म्हणूनच महत्त्वाचा आहे...
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

आशा बगे | Asha Bage

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा