या पुस्तकाविषयी
About this book
भारतीय साहित्यशास्त्र
ग.त्र्यं. देशपांडे
प्रा. देशपांडे यांच्या ग्रंथाचे दोन विभाग आहेत. पूर्वार्धांत भरताचार्यांच्या नाट्यशास्त्रापासून जगन्नाथ पंडिताच्या रसगंगाधरापर्यंतच्या म्हणजे ख्रिस्तपूर्व २०० पासून खिस्तोत्तर १७०० पर्यंत सुमारे दोन हजार वर्षांच्या काळांत साहित्यशास्त्राचा विकास कसकसा होत गेला हे त्या त्या कालखंडात होऊन गेलेल्या ग्रंथकारांच्या ग्रंथांतील विषयांचें चिकित्सक पद्धतीने पर्यालोचन करून दाखविले आहे. या विभागांत अनेक ठिकाणी प्रा. देशपांडे यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा प्रत्यय येतो.
उत्तरार्धांत शब्दार्थांचे स्वरूप, अभिधा, लक्षणा व व्यंजना या शक्ति, व्यंग्यार्थ किंवा ध्वनि, रसप्रक्रिया इत्यादि साहित्यशास्त्रांतील विषयांचे विवेचन आकर ग्रंथांस अनुसरून सविस्तर केले आहे. त्यांतील 'रसप्रक्रिया' हे प्रकरण या विभागाचा गाभा आहे. प्रा. देशपांडे यांनी अभिनवगुप्ताच्या अभिनवभारती व ध्वन्यालोकलोचन या टीकांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचे सिद्धान्त व त्याने केलेली पूर्वाचार्यांच्या मतांची परीक्षणें अत्यंत विशद रीतीने विवेचिली आहेत. साहित्यशास्त्रांतील विविध विषयांचे विवरण करताना व्याकरण, पूर्वमीमांसा, न्याय इत्यादि शास्त्रांतील पारिभाषिक संज्ञांचा व सिद्धान्तांचा उपयोग केला जातो. प्रा. देशपांडे यांनी त्या त्या स्थली त्या संज्ञांचे व सिद्धान्तांचे स्पष्टीकरण केले असल्याने त्या शास्त्रांशी परिचय नसलेल्यांसहि त्यांचे विषयप्रतिपादन सुबोध वाटेल असे झाले आहे.....
प्रा. देशपांडे यांची भाषा ओघवती, सुडौल व सुंदर आहे. त्यांनी विवेचिलेले विषय गंभीर आहेत, तथापि त्यांनी ते यावच्छक्य सुबोध केले आहेत.
- म. म. डॉ. वा. वि. मिआशी
(पुरस्कारातून)
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books