Blogchya Aarshapalyad

See more images

Blogchya Aarshapalyad

ब्लॉगच्या आरशापल्याड

Publisher
Shabd Publication
Language
Marathi

₹200

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

मराठी कथेने गेल्या काही वर्षात घेतलेली उसळी उत्साहवर्धक आहे. त्यातही कथा या वाङ्मयप्रकाराच्या किरटेपणाकडे निर्देश करत त्यावर केलेल्या हल्यामुळे स्वतःच्या कोशात जाऊन निमूट झालेल्या महानगरी कथावाङ्मयाने धारण केलेला बहुमुखी अवतार अचंबित करणारा आहे. या महानगरी कथाविश्वात मनस्विनी लता रवींद्रच्या कथेने आश्वासक पाऊल टाकले आहे. त्याच्या खुणा तिच्या या पहिल्याच कथासंग्रहात स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात. जागतिकीकरणोत्तर कालखंडात एकविसाव्या शतकाच्या आरंभी साहित्याच्या क्षितिजावर आलेली ही तरुण लेखिका स्वतःकडे आणि आपल्या भवतालाकडे धीटपणे बघताना, त्यातलं उत्तम आणि हीण आत्मीयतेने निरखत त्याची अभिव्यक्ती बेधडकपणे करताना दिसते. हा बेधडकपणा तिच्या पिढीचाच स्थायीभाव आहे, हे खरं असलं तरी जगण्याची व्यामिश्रता समजून घेण्याची तयारी नसणं हाही तिच्या पिढीचा स्थायीभाव आहे. अर्थात याला अपवाद असणारे जे थोडेबहुत आपल्या अवतीभवती आहेत. त्यात मनस्विनीची उपस्थिती ठळक आहे, कारण ती या व्यामिश्रतेला केवळ समजून घेत नाही तर, तिच्या पोटातला धाग्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करते. सुटलेले धागे उकलून बघते. या प्रयत्नात तिला मानवी नातेसंबंधांतली विदीर्णता आणि तिच्या तळाशी असलेलं माणसाचं एकटेपण दिसतं. जगण्याला नव्याने झटण्याची, नवी सुरुवात करण्याची जशी उमेद दिसते तशीच कशाशीही जोडले न जाण्यातून, तुटलेपणातून येणारी हतबलताही दिसते. या सगळ्यातून होणारा आनंद, येणारं दुःख वा कोणतीही भावना धडपणे व्यक्त न होण्याचा अनुभव येणं यामागे महानगरी जीवनशैलीने लादलेली एक अपरिहार्यता आहे. ती कोणत्याही अनुभवापाशी फार रेंगाळू न देता माणसांना पुढच्या क्षणाकडे खेचत नेते. यातला वेग आणि आवेग मनस्विनीच्या कथांमध्ये उतरताना दिसतो. त्यामुळेच तिची भाषाही पारंपरिक राहात नाही. पण या सगळ्या पलीकडे जात ती आजच्या जगण्यातल्या ताण्या-बाण्यांच्या आड असलेल लिगभावाचं आणि जातीयतेचं राजकारण जाणून घेत त्याचा तरल आविष्कार करते, हे तिच्या कथांच वेगळेपण आहे. जयंत पवार
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

मनस्विनी लता रवींद्र | Manaswini Lata Ravindra

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा