Dhuni

See more images

Marathi Poetry

Dhuni

धुनी

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2012
Pages
144
Language
Marathi

₹200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

माणसाचा देह तसा तुटक तुटक असतो; कष्टात हे फार खरं असतं. त्याच कष्टातून काव्य फुलू लागलं की मग मात्र देह अवघा बनतो आणि इंद्रधनूच्या झोपाळ्यावर झुलू लागतो; भावकाव्य हाच तो देह ! सुरेश सावंत हा आमचा कविमित्र सखा असण्यात फार उदास आणि करुण आहे; त्याची सखीही त्याला समाधानानं समजून घेणारी आहे आणि आहे ती अखेर कविताच आहे. त्या सखीचा हा प्रियकर आहे; अवघ्या देहासह म्हणूनच ! कुणाचं असणं काय किंवा नसणं काय, जगाला त्याचं काही नसतं; मृत्यू पांघरून जन्मलेले असोत की आपलेच आपल्यासाठीचे असोत की नियतीचे आघात पचवून अत्तराचा पाऊस पांघरणारे असोत की व्रणांचा वणवा वाहणारे वळवणारे असोत की वैर विसरून विनाशी वादळं कवटाळणारी असोत की एकविसाव्या शतकाची अपत्यं असोत. जग जगाच्या ठायी ठाम असतं हे नवीन नाही. फार पूर्वापार आहे. कवीचं काम तिथं असतं आणि तिथूनच सुरू होतं. ज्याचा त्याचा भाग ज्याच्या त्याच्या कपाळी, भाळी कोरलेला असतो हे तसं ठावूक असलं तरी उद्याचा भरोसा कवीच देत आलेला आहे; वादळंही बहकतात याचा हिशेब कवीच देत असतो. आणि शेवटी हिशेब हाच की 'धुनी'. उरल्यासुरल्यांची कणव असलेला हा कवी आहे!
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Suresh Sawant

सुरेश सावंत | Suresh Sawant

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा