Me To Hamal

See more images

Me To Hamal

मी तो हमाल

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2015
Pages
124
ISBN
9789385527005
Language
Marathi

₹150

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

दुष्काळाच्या छायेतील जामखेड आणि आष्टीमध्ये असलेलं भालवणी हे आप्पा कोरपे यांचं जन्मगांव जन्म साधारण १९३६चा मधुकर गहिनीनाथ कोरपे पूर्ण नाव. बापाचं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बारा वर्षाच्या. मुलीबरोबर साटंलोटं करून झालेलं लग्न. घरात अठराविश्वे दारिद्र्य. कुटुंब एकट्या बापाच्या तुटपुंज्या मजुरीवर चालायचं. तशात कुटुंबात पाच खाणारी तोंडं. भुकेपायी आई मुलांना बुडवून मारायला निघालेली - दोन भावंडे, आणि बापाची दारिद्र्यामुळे झालेली होरपळ व मृत्यू जवळून पाहिलेला - आपली आणि मुलाची भाकरीची सोय व्हावी म्हणून मुलाच्या संमतीने दुसऱ्या नवऱ्याशी गाठ बांधणारी त्यांची आई - ओली बाळंतीण असताना एका लेकराला सोडून गेलेली आई - तेही लेकरू गेल्यावर एकाकी धिटाईने कधी गुरे वळण्याचे, कधी भुसाराचे दुकान चालविण्याचे, कधी एस.टी. स्टॅण्डवर चहाचे हॉटेल चालविण्याचे तर कधी कोंडी खोदण्याचे काम करीत, अहमदनगर येथे येऊन हमाली करणारे श्री. आप्पा कोरपे धडाडीने व प्रामाणिकपणे आज महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या उपाध्यक्ष पदापर्यंत कसे गेले ते सांगत आहेत "मी तो हमाल" या आपल्या आत्मकथेत.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

आप्पा कोरपे | Appa Korape

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा