Moropantanchi Shlokkekavali

See more images

Marathi Poetry

Moropantanchi Shlokkekavali

मोरोपंतांची श्लोककेकावली

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
160
ISBN
9789380617732
Language
Marathi

₹200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

मध्ययुगीन कवितेच्या परंपरेत संतकवितेनंतर पंडितांच्या काव्यरचना आढळतात. पंडित कवींच्या रचनेत वैविध्य आहे. रसपूर्ण काव्यनिर्मिती, संस्कृत भाषेचा डौल, भाषेची प्रौढता व प्रगल्भता, सरस निर्मिती, पांडित्याचा आविष्कार, मनापेक्षा मेंदूला झुलवण्याची क्षमता, अलंकार-चमत्कृती, शब्दांच्या कसरती, संस्कृतचा आदर्श, सामासिक शब्दांचे प्राबल्य, कारागिरीला महत्त्व, सांकेतिकता इत्यादी गुणदोष या कवितेत दिसून येतात. मोरोपंत याच पंडिती परंपरेने कवी असल्याने त्यांच्या विपुल लेखनातही याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. तथापि 'श्लोककेकावली' हा पंतांच्या भक्तीचा उत्कट व प्रभावी आविष्कार आहे. हे आत्मनिष्ठ आणि करुणरम्य भावकाव्य आहे. स्वोद्धारासाठी ईश्वराकडे केलेली मोरोपंतांची आर्त विनवणी, हा या काव्याचा ठळक विशेष आहे. संतत्व वृत्ती असणाऱ्या एका भगवत्भक्ताचे हे आत्मनिष्ठ काव्य कुणाही मराठी रसिकाला आकर्षित करणारे ठरते. एका पुराणिकाची ही कीर्तनसदृश रचना आहे. पंतांच्या कल्पना आणि भावनांना उठाव देणारे हे काव्य आहे. मोरोपंतांच्या व्यक्तिमत्त्वाची सारी गुणवैशिष्ट्ये 'श्लोककेकावली' मधून ठळकपणे जाणवतात. म्हणूनच मोरोपंतांच्या रचनेत या काव्याला स्वतंत्र स्थान आहे. काही शतकांपूर्वी लिहिले गेलेले हे काव्य आजही काव्यरसिकांना तेवढेच टवटवीत वाटते.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. सतीश बडवे | Dr. Satish Badwe

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा