About this book
विशिष्ट उद्देशाने अनेक वर्ष मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकामाचं कार्य हाती होऊन, संस्कारांचा वेगवेगळ्या अंगांनी विचार करणाऱ्या डॉ० लता काटदरे यांचं हे तिसरं पुस्तक. नवीन पिढी संस्कारित व्हायला हवी असेल तर प्रथम पालकांनी स्वतःला संस्कारित करून घ्यायला हवं. मुलांच्या संगोपनात या भूमिकेचा आग्रह डॉ० लता काटदरे सातत्याने धरत आल्या आहेत. पालकांचं व मुलांचं जीवन पैलूदार, सुसंस्कृत होण्याकरता आणि ते निर्भेळ आनंदाने भरून राहण्याकरता हस्तकला आणि चित्रकला ही कलामाध्यमं वापरता येतात. या कला त्यांना निवान्त करतात. परंतु, या दोन कला म्हणजे केवळ छंद जोपासण्यापुरती ओळखली जाणारी कौशल्यं नाहीत. थोडक्यात या कलांचा आस्वाद मुलांच्या जीवनविषयक कल्पनेला आणि सर्वांगीण विकासाला कसा विविध क्षमता पुरवणारा ठरतो, ते समजून देणं हे या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. विवेचनाच्या साध्या, सोप्या शैलीतून उलगडणारं वेगवेगळ्या कलांच्या नमुन्यांचं नेत्रसुखद दर्शन घडवणारं हे पुस्तक म्हणजे एकप्रकारे दृश्यात्मक कलाआस्वादच आहे! केवळ उमलत्या वयातील मुलांच्या पालकांनाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकांनाही आल्हाद देणारा...
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.