Nivdak Nagnath Kottapalle Ek Akalan

See more images

Nivdak Nagnath Kottapalle Ek Akalan

निवडक नागनाथ कोत्तापल्ले एक आकलन

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
96
ISBN
9789380617718
Language
Marathi

₹120

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

निवडक नागनाथ कोत्तापल्ले : एक आकलन' हे पुस्तक अभ्यासकांच्या हाती देताना आनंद होत आहे. 'विशिष्ट लेखकाचा अभ्यास' या अभ्यास पत्रिकेसाठी नागनाथ कोत्तापल्ले यांच्या सावित्रीचा निर्णय, गांधारीचे डोळे, साहित्याचा अन्वयार्थ, मूड्स आणि नंतरच्या कविता या साहित्यकृती अभ्यासासाठी आहेत. या साहित्यकृतींच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करावे. अभ्यासाच्या काही दिशा दाखवाव्यात हा हेतू समोर ठेवून या पुस्तकाचा प्रपंच केला आहे. साठोत्तरी मराठी साहित्यात निर्माण झालेली समाजाभिमुख पुरोगामी जाणीव ही अनेक लेखकांप्रमाणेच कोत्तापल्ले यांच्या लेखनात आली आहे. मानवी जीवनातील माणसांच्या नातेसंबंधांचा, भावजीवनाचा शोध महत्त्वाचा ठरतो, तो शोध लेखक घेत असतो. कोत्तापल्ले यांनी आपल्या विविध कलाकृतीतून तो शोध घेतला आहे. त्यातून त्यांची जीवनसरणी, विचारसरणी स्पष्ट होते. ग्रामीण माणसाचे भावविश्व एका कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून या कलाकृतीतून अवतरले आहे. त्याचा अभ्यास कसा करता येईल या दृष्टीने हा प्रयत्न विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

प्रा. बाळासाहेब लाहोर | Prof. Balasaheb Lahor

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा