Pawasat Surya Shodhanari Manasa

See more images

Pawasat Surya Shodhanari Manasa

पावसात सूर्य शोधणारी माणसं

लेखक Neeraja | नीरजा
Publisher
Popular Prakashan
Language
Marathi

₹275

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

पावसात सूर्य शोधणारी माणसं नीरजा 'जे दर्पणी बिंबले' आणि 'ओल हरवलेली माती' या कथासंग्रहानंतरचा 'पावसात सूर्य शोधणारी माणसं' हा नीरजाचा नवा कथासंग्रह, २००५ ते २००७ या काळात लिहिलेल्या दहा कथांचा हा संग्रह आहे. नीरजा यांच्या कथा मूलतः स्त्रीलक्ष्यी आहेत. मानवी नात्याचे सूक्ष्म कंगोरे शोधताना विवाहसंबंधातील विसंवादाची विविध रूपे चित्रित करताना दोन माणसांचे नाते एका भवतालात घडत-बिघडत असते याचे भान लेखिकेला आहे. पण यातील स्त्री नात्याच्या भोवऱ्यातही आपली पाबले घट्ट रोवून उभी राहण्याचा यत्न करते. लेखिकेला स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची तीव्र जाणीव आहे, पण अपेक्षाभंगाचे दुःख स्त्रीपुरुष दोघांनाही आहे याचे भान आहे! खलत्व असणाऱ्या आक्रमक पात्रांविषयी तिला करुणा बाटते. स्त्री-पुरुष नाते देहमनाचे आहे, त्यात कधी शरीर, नात्याचे आविष्करण करणारे तरल बाद्य होते, तर कधी ते आक्रमक प्रसंगी हिंस्र शस्त्र होते. या साऱ्यात गुंतलेली पात्रे नीरजा कथेत येतात - त्या चित्रणात लेखिका व्यंजकतेचा, प्रसंगी नर्मविनोदाचा वापर करते. नीरजा आजची कथालेखिका आहे. त्यामुळे अनुभव स्वाभाविकपणे भिन्न कथारूपे, निवेदनशैली, शोधत जातो. 'सुशांतचा सोळावा वाढदिवस' वा 'गुरुचरित' या कथांचे यासंदर्भात वाचन करता येईल. नीरजा यांच्या कथांत महानगरीय जीवनाच्या वेगआवेगाची जाणीव अनेकदा शैलीच्या गतीतून, लयीतून व्यक्त होते. दीर्घकथेचा स्वभाव नसणाऱ्या काही दीर्घ होताना दिसतात. पण लेखिकेची लेखनांर्तगत एकाग्रता अशी आहे की निबेदन 'भटकत' नाही. तसेच निवेदनातील संदर्भसंपन्नता जड होत नाही. कवयित्री म्हणून समकालीन मराठी कवितेवर नीरजाची मोहोर आहेच. पण गेल्या काही वर्षांतील त्यांच्या अनुभवसापेक्ष कथारूपे शोधणाऱ्या कथेने बाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. - पुष्पा भावे

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

नीरजा | Neeraja

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा