या पुस्तकाविषयी
About this book
सृष्टी ज्या वैश्विक पायांवर तगून उभी आहे, अशा पायांवर अर्थगर्भभाष्य म्हणजे समृध्द कल्पनाविश्वातली ही समग्र कलात्मक कविता ! सुधीर राजाराम देवरे यांच्या 'पाय नसलेली माणसं' या संग्रहातील बहुतांश कवितांमध्ये 'पाय' ही बहुअर्थी प्रतिमा, कुठं प्रतीक, तर कुठं रूपक होऊन येते. (कुठं जसाच्या तसा वास्तव मानवी- जैवीक अवयवही). आपल्यातल्या विविध व वेगळ्या परिप्रेक्षातल्या भौतिकी आणि अतिभौतिकी, अधू आणि तंदुरूस्त पायांवर ह्या कवितांत आदिम वेदनेचं मूल्यगर्भ चिंतन असून मुक्त काव्य, छंद, गूढ, अभंग, आशयघन, कलात्मकतेपासून ते अतिशय सहज सोप्या सरळ बोलीतल्या ओघवत्या शैलीतील चिंतनात्मक रचनेपर्यंतच्या संवेदनशील कविता ह्या संग्रहात वाचायला मिळतात. पाय नसूनही उंच भराऱ्या घेणारे लोक आणि सृष्टीतल्या अनेकार्थी पायांचं चित्रण ह्या प्रायोगिक नवकवितेत सतत होत राहतं.
लोकनाथ यशवंत
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books