Ranbhuliche Divas

See more images

Ranbhuliche Divas

रानभुलीचे दिवस

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2024
Pages
134
ISBN
9788119258680
Language
Marathi

₹240

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

खूप दिवस झाले या गोष्टीला. तरीही, चांदणं उतरलेल्या शांत वाहत्या पाण्यासारख्या ह्या आठवणी कायम झुळझुळत राहतात. कधीकधी ह्या आठवणी खूप दाटून येतात. तहानेएवढी ओंजळ भरून घ्यावी; तर ती लगेच गळून जाते. ओंजळ पुन्हा रिकामी होते. तशीही माणसांची ओंजळ शापितच. रितेपणाचा शाप तिला जन्मापासून मिळालेला. पण ओंजळीतून गळून गेलेले हे दिवस आठवले, की मन अस्वस्थ होतं. आपलं गाव, माती, माणसं मागे सोडून धाव धाव धावावं; खूप दूर आल्यावरही हाताला काहीच गवसू नये; परतीच्या पायवाटाही बुजून जाव्यात, असे हे अधांतरीचे दिवस. ना आभाळ आपलं, ना माती. आरसा फुटून आपलंच प्रतिबिंब असंख्य तुकड्यात विखुरल्या जावं, असे हे आठवणींचे तुकडे. ओंजळीत भरताही येत नाही, की जुळवताही येत नाही. मग हातात येईल तो तुकडा घेऊन शोधत राहावं आपलंच फुटकं प्रतिबिंब. याशिवाय दुसरं काय उरतं आपल्या हातात?"
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Santosh Alanjkar

संतोष आळंजकर | Santosh Alanjkar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा
बातम्यांत

Events & honours