या पुस्तकाविषयी
About this book
डॉ. सुधीर रा. देवरे हे साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन, लोकवाड्.मय यांचे अभ्यासक आणि अहिराणी भाषा संशोधक म्हणूनही प्रख्यात आहेत. 'समीक्षा: साहित्य, कला आणि जीवन' या समीक्षा ग्रंथात समीक्षेची समीक्षा आहे, चित्रपट, चित्र-शिल्पकला आणि साहित्याची समीक्षा आहे, माणसाच्या वेदनेच्या मीमांसेसहीत साहित्यविचार आहे. यात द. बोनाल्ड, वाय. ल्यूकीन, डेव्हिड फोरगाच, ल्यूसिये गोल्डमान, इप्पोलित तेन, अन्र्स्ट फिशर, प्लेटो, अॅरिस्टॉटल यांचे सिध्दान्त द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेशी पडताळून पाहण्यात आले आहेत. याशिवाय धर्मचिकित्सक तुकाराम, अहिराणी ग्रामीण लोकदैवत कानबाईच्या आरतीविषयी, साहित्यातील ग्रामीणता आणि पुन्हा गोडसेंसह भालचंद्र नेमाडे, मीनाक्षी पाटील, अशोक नायगावकर यांच्या समीक्षा काव्यकृतीसहीत इतर महत्वाची आशयगर्भभाष्य असलेली जीवनमीमांसा या ग्रंथात उपयोजित झाली आहे. समीक्षक डॉ. सुधीर रा. देवरे यांच्या समग्र मीमांसेत काळ, समाज, परिवेश, जीवन जाणिवा, निष्कर्ष, अनुमाने काढत ज्ञानगर्भ मूल्यमापन असल्याने मराठी साहित्यातील समीक्षक- संशोधकांसहीत पीएच. डी. करणाऱ्या अभ्यासकांना त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही संदर्भग्रंथ म्हणून वाटाड्याचं काम करेल.
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books