Sarjansamiksha

See more images

Sarjansamiksha

सर्जनसमीक्षा

Publisher
Mouj Prakashan Gruh
Language
Marathi

₹350

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

आपापल्या सर्जनशील लेखनातल्या वेगळेपणानं ज्यांनी मराठी साहित्यविश्वात दृढस्थान प्राप्त केलं आहे, त्यात गौरी देशपांडे, पु. शि. रेगे, भालचंद्र नेमाडे आणि बेबी कांबळे यांचा समावेश होतो. गौरी देशपांडे यांची 'कावळ्या-चिमणीची गोष्ट' ही कथा, नेमाडेंची 'जरीला' आणि रेगेंची 'सावित्री' या कादंबऱ्या आणि बेबी कांबळे यांचं 'जिणं आमुचं' हे आत्मकथन म्हणजे एक मोलाचा सामाजिक-सांस्कृतिक-वाङ्मयीन स्वरूपाचा दस्तावेज आहे. इथे या साहित्यकृतींकडे एका सर्वस्वी वेगळ्या दृष्टीनं पाहाण्यात आलं आहे. साहित्यातून व्यक्त होणारी स्त्री-रुपं, जातीतलं वा समाजातलं स्त्रीचं स्थान आणि त्यामागे उभी असणारी लेखकाची दृष्टी याची डोळस, मर्मग्राही चिकित्सा म्हणजे या पुस्तकाचा पूर्वार्ध. उत्तरार्धात वाङ्मयेतिहासाशी संबंधित दोन लेख आहेत. त्यातही वाङ्मयेतिहासाच्या लेखनात स्त्री-लेखकांची कशी उपेक्षा झाली आहे याचा इथला ऊहापोह सडेतोड आणि लक्षवेधक तर आहेच, पण आपल्या भूमिका तपासून पाहायला लावणारा आहे. दलित कादंबरीबद्दलचं, त्यात झालेल्या स्थित्यंतरांविषयीचं इथलं विवेचनही मार्मिक आणि विचारप्रवृत्त करणारं आहे हे निःसंशय !
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

पुष्पलता राजपुरे - तापस | Pushpalata Rajapure - Tapas

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा