या पुस्तकाविषयी
About this book
कै० बा० सी० मर्देकर यांच्या सौंदर्यशास्त्रीय लिखाणाच्या नंतर आता दीर्घ काळ होत आलेला आहे. या दीर्घ काळात मराठीत सौदर्यशास्त्रावर काही लिखाण झालेच नाही असे नाही. पण एक तर हे लिखाण स्फुट लेखांच्या पद्धतीचे आहे किंवा मर्डेकरांच्या विवेचनाशी आपले मतभेद नोंदविणारे अगर त्या विवेचनाचे समर्थन करणारे आहे.
सन्माननीय अपवाद गृहीत जरी धरले तरी स्थूलमानाने मराठीतील सौंदर्यचर्चेचे स्वरूप नेहमी मर्देकर या सूत्राच्या भोवतीच फिरत राहिलेले दिसते. फारा दिवसांच्या नंतर सौदर्यशास्त्रीय विवेचनात यापेक्षा अगदी निराळी दिशा स्वीकारणारा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रा० पाटणकर यांनी लिहिलेला आहे. मराठीतील सौंदर्यशास्त्रविषयक चिंतन पाटणकरांच्या या लिखाणामुळे आहे त्याहून अधिक खोलात शिरलेले आहे असे म्हणायला हरकत नाही. मराठीपुरते बोलायचे तर 'सुंदर म्हणजे काय?' या प्रश्नाच्या उत्तराभोवती मर्देकरांनी सौंदर्यशास्त्राचा प्रपंच थाटलेला आहे असे दिसून येते. नेमका हा प्रश्न सोडून अगदी वेगळ्याच दिशेने पाटणकरांच्या विचाराचा प्रवास सुरू झालेला आहे. कोणत्याही शास्त्रात एखाद्या नव्या दिशेने विचार सुरू झाला म्हणजे पुष्कळ दिवसांचा साचलेपणा एकदम मोडल्यासारखा वाटू लागतो. थोडे मोकळेपणही जाणवते. तसे पाटणकरांच्या या पुस्तकामुळे झाले आहे. इ० स० १९७४ साली मराठीत समीक्षाक्षेत्रात जे लिखाण प्रकाशित झाले आहे त्यात सर्वांत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक असा ग्रंथ निदान मला तरी पाटणकरांचा वाटतो.
- नरहर कुरुंदकर ('ललित', जून १९७५)
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books