भारतीय वाद्ये

Bharatiy Vadye

प्रकाशक
Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

अठराव्या शतकात भारतीय विद्यांबद्दल संशोधन सुरू झाल्यापासून भारतीय संगीतविषयी कुतूहल जागे झाले. संगीताबद्दल बरेचसे संशोधनही झाले आहे. परंतु त्यात वाद्यांविषयी पद्धतशीर व सांगोपांग विवेचन अजून आढळत नाही. काही त्रोटक माहिती देणारी छोटी पुस्तके, कोठे एखाद्या पुस्तकात एखादे प्रकरण, काही तुरळक लेख, एवढेच साहित्य वाद्यांबद्दल उपलब्ध आहे. ही उणीव अंशतः भरून काढण्यासाठी हा ग्रंथ तयार केला आहे. भारतीय वाद्यांविषयी जेथे जेथे काही माहिती आली आहे ती एकत्र करून एक सर्वांगीण चित्र उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. आदिवासी, जानपद आणि नागर अशी तिन्ही प्रकारची वाद्ये या चित्रात एकत्र मांडली आहेत. प्रचलित संगीत, प्राचिन शिल्पे व चित्रे, संगीतावरील ग्रंथ इतर साहित्य, इत्यादी रूपांत सबंध देशभर वाद्यांविषयी जी सामग्री उपलब्ध आहे तिचा या ग्रंथात उपयोग केला आहे. शिवाय ग्रंथकाराने देशभर हिंडून जी माहिती गोळा केली तिचीही यात भर घालती आहे. सर्व उपलब्ध माहिती एकत्र करून वाद्यांची वर्गवारी लावणे, देशातील वेगवेगळ्या लोकसंस्कृतींशी त्यांचे ऋणानुबंध शोधणे, व अशा रीतीने वाद्यांचा एक विवेचक इतिहास तयार करणे, हा ग्रंथाचा प्रयत्न आहे. अर्थात अशा प्रकारचा हा पहिलाच भारतीय ग्रंथ ठरेल. उपलब्ध माहिती परिपूर्ण आहे असे म्हणता येत नाही. हा देश एवढा अफाट व प्राचीन आहे की त्याचे संपूर्ण ज्ञान आपल्याला झाले असा कोणीही दावा करू शकत नाही अजून बरेच संशोधन करता येईल. नवीन माहिती उजेडात येऊ शकेल. तसे झाले म्हणजे कदाचित या ग्रंथातील काही माहिती व मते चूकही ठरतील. तसे व्हावे हीच ग्रंथकाराची अपेक्षा आहे. या ग्रंथाने अधिक संशोधनाला चालना मिळावी.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

बी. चैतन्य देव | B. Chaitanya Dev

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like