भोवळ

Bhoval

प्रकाशक
Shabd Publication
प्रकाशन वर्ष
२०११
पृष्ठे
१४०
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर भारतातील वास्तव झपाट्याने बदलत गेलं. खुलेपणाचा मंत्र घेऊन आलेले हे बदल या स्थित्यंतराच्या काळात समस्यांचा गुंता वाढवणारे ठरले. शेअर बाजार, सहकारी क्षेत्र, बँका, उद्योगधंदे आणि सरकार यांच्यातले परस्परसंबंध तणावाचे बनले. एक नवा आत्मकेंद्री नवश्रीमंत वर्ग निर्माण झाला... अशा वातावरणात दादरमधील एक सहकारी बँक बुडाल्यानंतर, या घटनेचे प्रतिध्वनी कॉर्पोरेट, शेअर, मिडिया आणि पेज श्री जगतात उमटले... ही झळ सामान्य माणसाच्या जगण्याला येऊन भिडायलाही वेळ लागला नाही. आशिष पाटील, नेहा अत्रे, नयनिका, नाना हे सारेच या घटनाचक्राचे साक्षीदार... मध्यमवर्गीय नाना अपरिहार्यपणे या वादळात सापडतात तेव्हा काय घडतं याचा लेखाजोखा मांडणारी 'भोवळ' ही कादंबरी मराठी वाचकाला आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारी आहे. आपल्या संवेदनशील वैचारिक लिखाणाबद्दल नामवंत असलेले लेखक-पत्रकार हेमंत देसाई यांची ही पहिलीच कादंबरी आहे. तिच्या रूपाने मराठी कादंबरीच्या जगात एका नवीन विषयक्षेत्राने प्रवेश केला आहे. आर्थिक विश्वाचा तपशील आणि खोली या कादंबरीत साकार करताना लेखकाने कादंबरीच्या कलात्मकतेशी कुठलीही तडजोड केलेली नाही. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडित असलेली ही वेधक आणि भेदक कादंबरी वाचकांना निश्चितच गुंगवून टाकेल.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

हेमंत देसाई | Hemant Desai

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like