बिढार

Bidhar

प्रकाशक
Popular Prakashan
भाषा
मराठी

₹४००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

चांगदेव चतुष्टय : १ बिढार भालचंद्र नेमाडे 'बिढार' या भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीतील चांगदेव पाटील हा एक 'भोगी' म्हणूनच जन्माला आलेला आहे. जीवनातील निरनिराळे अनुभव भोगूनही आपण कशासाठी जगायचे याचे त्याला उत्तर मिळत नाही. आपण आगंतुक, अनावश्यक, उपरेच आहोत असे त्याला वाटते, प्रस्थापितांशी संघर्ष करूनही ज्याअर्थी त्याला त्यांचा हेवा वाटत राहतो त्याअर्थी बंडखोरांच्या तत्त्वज्ञानातही अपुरेपणाच आहे. या त्याच्या प्रत्ययानुभवाची कहाणी म्हणजे प्रस्तुत कादंबरी आहे, जीवन कसे आहे. ते कशासाठी जगायचे याचे उत्तर त्याला जीवन जगूनच कळते. ही त्याच्या जगण्याची निष्ठा वाचकांच्या जाणीवनिष्ठेत भर घालते. भले तो पराभूत होबो किंवा अस्तित्वासंबंधी साशंक होवो. या कादंबरीत 'मी', 'तो', 'आपण' या तिन्हीही रूपांनी चांगदेव संबोधित होतो. त्यामुळे ती एका व्यक्तीबरोबर 'चांगदेव' या प्रवृत्तीचीही कथा होते, 'मी' आणि 'तो' या दोन भूमिकांमुळे त्याची जगाविषयीची लिप्तता व अलिप्तता व्यक्त होते. येथे चांगदेवला स्वतःला काय वाटेल, त्याने स्वतः कोणती प्रतिक्रिया केली हे सांगायचेच नसते. तो स्वतःविषयी फारच कमी बोलतो. 'कथासरित्सागरा'तल्या गोष्टींप्रमाणे इंद्रदत्ताला जशी दोन शरीरे असतात तसा 'मी' चांगदेव आणि 'तो' चांगदेव अशा दोन भूमिका असतात. या रचनेमुळे शारीर जग, मानसिक जग, क्रियाशील सृष्टी, अलिप्त सृष्टी, भोगी-अगोभी, जागृत-अजागृत अशा विविध पातळ्यांवर एकाच वेळी कादंबरीला वावरता आले. त्यामुळे कादंबरीत चांगदेव विविध भूमिका बजावतो. स्वतःला उलटसुलट दिशेने पडताळून वेगवेगळ्या फ्रेममध्ये बसवू पाहतो. त्याचे जीवनावर प्रेम आहे पण जीवनासंबंधी कोणतीही स्वप्ने नाहीत. राजकारणी वास्तवात राहूनही, आपली अभिरुची आणि तत्त्वनिष्ठा जपणारा, अपमान, दारिद्र्य, रोगराई, धावपळ, बकालपणा भोगूनही नामानिराळा होऊ पाहणारा, आपले बिढार कुठेही, केव्हाही पाठीवर टाकून चालता होणारा, निरासक्त, निराश्रित 'ब्रह्मचारी'च आहे. जयश्री पाटणकर पूर्वप्रसिद्धी: साहित्यसूची, मार्च १९८९ चांगदेव चतुष्टयासंबंधी, संपा. राजन गवस, २००१
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे | Bhalchandra Nemade

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like