चिंतनासी न लगे वेळ

Chintanasi Na Lage Wel

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
२८२
ISBN
9788380617725
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

गोकुळामध्ये बालकृष्णाने केलेल्या अनंत लीलांमधील एक लीला मोठी मधुर आहे. रांगणाऱ्या कृष्णाने आपल्या रूपसुंदर मुखात मातीची बाळमूठ रिती केलेली पाहताच माता यशोदा धावून आली. 'आई मी नाही खाल्ली ग माती' असे म्हणत खऱ्याखोट्याचा निवाडा करण्यासाठी नंदनंदनाने उघडलेल्या त्याच्या सुकुमार बाळमुखात चौदा भुवनांचे दर्शन घडल्याने यशोदा विस्मयचकित होऊन गेली. 'चिंतनासी न लगे वेळ, हे डॉ. दिलीप धोंडगे यांनी संतबोधाच्या मांडलेल्या कीर्तीगायनातून साकारलेले ग्रंथरूप म्हणजे त्या बालकृष्णाचे विस्तारलेले मंगल मुखकमलच जणू! त्यांत डोकवले की आपल्याला घडते भागवतधर्मीय संतपरंपरेच्या विराट विचारविश्वाचे बीजरूपदर्शन... आणि आपली अवस्थाही होऊन जाते गोकुळातल्या यशोदेसारखी. 'महाराष्ट्र' नावाचे मन संतबोधाने घडवलेले आहे. “संतांचे संगती मनोमार्ग गती", या ज्ञानदेवांच्या उक्तीनुसार प्रेम, समता, नीतीपूर्ण भक्ती यांसारख्या शाश्वत मूल्यांच्या मार्गावरून वाटचाल करत गुणसंपन्न अशा ऐहिक - पारलौकिक जीवनाच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी लोकसंस्थेला गतिमान राखणाऱ्या संतबोधाचे स्मरण सर्व काळ घडावे यासाठी या ग्रंथाचे पाथेय सतत हाताशीच हवे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Dr. Dilip Dhondage

डॉ. दिलीप धोंडगे | Dr. Dilip Dhondage

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like