About this book
या पुस्तकाविषयी
प्रा. विनायक बंगाळ यांचा हा ग्रंथ म्हणजे मौखिक परंपरेने चालत आलेल्या आणि आईने सांगितलेल्या ( जात्यावरील) ओव्यांचा आस्वादात्मक रसास्वाद आहे. आपल्या अशिक्षित आईच्या मुखातलं अक्षरलेणं शब्दबध्द करून लेखक आपला साहित्यिक वारसा कृतज्ञतेने जपतो आहे. जात्यावरची ओवी ही अस्सल मराठमोळी ! मराठीच्या आदिबंधातून निर्माण झालेली ! ती जितकी प्राचीन तितकी विविधतेने नटलेली आहे. याचा प्रत्यय ह्या ग्रंथातूनही येतो. या ग्रंथातील ओव्यात जात्याला ईश्वर मानून केलेले पूजन आहे.. स्थानिक देव-देवता, सर्वमान्य देव-देवता, परिसर वर्णन, शेतीवाडी, पाऊस- पाणी, सण-समारंभ, लग्न, सासर-माहेर, मुलंबाळं, यांच्यासहीत एकूणच सारा गोतावळा आहे. संसार - प्रपंचात जे जे म्हणून असते ते ते सर्व काही आहे. त्याची गंमत वाचण्यातच आहे. 'आत्मपर' या विभागातील ओव्या वाचताना आपण अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. लोकसंस्कृतीची गरज, श्रमपरिहार, आत्माविष्कार, मनोरंजन व आनंदनिर्मिती इत्यादी प्रेरणांतून ओवीची निर्मिती झाली आहे. सर्व जाती- धर्मातल्या मराठमोळ्या स्त्रियांनी तिला कडेखांद्यावर घेऊन मोठी केली आहे. आजही तिच्यातून संपूर्ण मराठी स्त्री-मनाचा आत्माविष्कार होताना दिसतो. या ग्रंथातील सासुरवाशीण ही त्याच पठडीतील आहे. तिचे अवघे भावविश्व आणि विचारविश्व या ग्रंथातल्या एकशे त्रेचाळीस ओव्यांतून उमलले आहे.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं