नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह

Natak Ani Rangbhumi Paribhashasangrah

प्रकाशक
Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
भाषा
मराठी

₹२६३

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

प्रोफेसर विलास वसंत खोले हे मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि पुणे येथील पदव्युत्तर अध्ययन व संशोधन विभागाचे प्रशासकीय समन्वयक म्हणून निवृत्त झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या एम.ए. परीक्षेत मराठी हा विषय घेऊन ते सर्व विषयांत सर्वप्रथम आले होते आणि त्यांना कुलपती सुवर्णपदक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, रा. कृ. लागू व जी. एम. साठ्ये ही पारितोषिके मिळाली होती. नंतर त्यांनी छत्तीस वर्षे मराठी या विषयाचे अध्यापन केले. शोकान्तिकेची संकल्पना व काही मराठी नाटके या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी संपादन केली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सोळा विद्यार्थिनींना पीएच. डी. आणि पंचवीस विद्यार्थिनींना एम. फिल. या पदव्या मिळाल्या. विलास खोले हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे इमिरिटस फेलो आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याचे सीनिअर फेलो होते. त्यांच्या नावावर पंधरा स्वतंत्र आणि एकवीस संपादित पुस्तके आहेत. याशिवाय पंचमहाकाव्ये, नोबेल पुरस्कारप्राप्त लेखिका, प्रकाशचित्रे, समीक्षासंज्ञा, अशा लेखमाला त्यांनी लिहिल्या आहेत. 'भालचंद्र नेमाडे व्यक्ती, विचार आणि साहित्य' हा संपादित ग्रंथ त्यांनी सिद्ध केला आहे. त्यांच्या लेखनाला 'महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार', महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार व अन्य मान्यवर संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. पुणे विद्यापीठाने 'संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार' देऊन त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेने त्यांना 'डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कारा'ने सन्मानित केले आहे. तसेच ते कै. प्रा. र. बा. मंचरकर जीवनगौरव पुरस्काराचेही मानकरी आहेत. नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह या ग्रंथात विलास खोले यांनी भारतीय नाट्यशास्त्र, पाश्चात्त्य नाट्यशास्त्र आणि निवडक मराठी नाट्यरूपे यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या पारिभाषिक संज्ञांचा ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात विस्तृत विवरणात्मक उलगडा केला आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like