रुद्र

Rudra

प्रकाशक
Shabd Publication
प्रकाशन वर्ष
२००९
पृष्ठे
९८
भाषा
मराठी

₹११०

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

एन्कीच्या राज्यात या कादंबरीनंतर खूप वर्षांनी विलास सारंगांची रुद्र ही नवी कादंबरी मराठीत प्रकाशित होते आहे. आधुनिक जीवनाचे संदर्भ शाबूत ठेवत रुद्र संस्कृतीच्या इतिहासाच्या गाभ्यात, मिध्यकथांच्या घनदाट प्रदेशात शिरली आहे. मिथ्यकथा आणि आधुनिकता यांना परस्परांच्या संदर्भात सक्रिय करत सारंगांनी एक लोकविलक्षण विश्व रुद्रमधून निर्माण केले आहे. रुद्र मधल्या या लोकविलक्षण विश्वाच्या उभारणीतून निर्मिती आणि विध्वंस हे मानवी संस्कृतीतील चिरंतन द्वंद्व साकार होते. या द्वंद्वाच्या कक्षेत जन्म, मृत्यू, समाजव्यवस्था, लैंगिकता, नातेसंबंध, हिंसा, प्रेम, द्वेष यांसंबंधीच्या विविध अनुभवांना समाविष्ट करत, संस्कृतीमधील त्यांच्या स्थानांचा मूलगामी शोध रुद्रमधून घेतला जातो. सूक्ष्म विश्लेषण आणि तीक्ष्ण अर्थनिर्णयन या सारंगांमधील क्षमता येथे कसाला लागलेल्या आहेत. पौराणिक कथनपद्धतीचा जाणीवपूर्वक केलेला उपयोग, कादंबरीच्या प्रचलित संकेतव्यूहाचा अभिनव रीतीने केलेला वापर आणि उपहास-उपरोधांचा स्पर्श झालेली विनोदबुद्धी या विशेषांमुळे रुद्रला वाचनीयतेचे परिमाणही प्राप्त झाले आहे. पारंपरिक मिथ्यकथांचा आर्ष उघडेपणा आणि आधुनिक कथनांमधील मूलभूत संदिग्धता या दोहोंना एकाच वेळी कवेत घेणारी रुद्र मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी ठरावी ! - हरिश्चंद्र थोरात

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Vilas Sarang

विलास सारंग | Vilas Sarang

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like