सांगनं नही पण सांगनं वन

Sangana Nahi Pan Sangana Wana

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१६४
ISBN
9789385527098
भाषा
मराठी

₹२१०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सांगनं नही पन सांगनं वनं हे डॉ. दिलीप धोंडगे यांचे अहिराणी भाषेतील पहिलेच ललितगद्य लेखन आहे. ते मोहक तर आहेच; पण भावकल्लोळ निर्माण करणारे शक्तिमान कथन आहे. या लेखनात 'सांगणे' ही क्रिया अतिशय उत्फुल्ल बनलेली आहे. सांगितल्याशिवाय राहवत नाही, गोष्ट पोटात ठेवता येत नाही अशी अपरिहार्य कथानात्मता या लेखनाला लाभलेली आहे. सांगणाऱ्याची अधीरता ऐकणाऱ्यामध्येही निर्माण होते. सांगणारा ऐकणाऱ्याला सारखा आपल्या बरोबर घेतो. सांगण्याचा ओघ अखंड आहे. माणसांबद्दलचे, गुराढोरांबद्दलचे, शेताबद्दलचे, शाळेबद्दलचे, मित्रांबद्दलचे, नात्यातले आणि नाते निर्माण झालेल्या असे कोणाही बद्दलचे 'स्व' चे आकलन आहे. या लेखनाचे प्रकट वाचन अत्यंत आनंददायी व अहिराणी बोलीरूपाचा प्रत्यय देणारे घडू शकते. त्यात खेड्यातले नाट्य, हास्य, सुखदुःख आहे. जगणे, बहरणे, मोडून पडणे आणि परिस्थितीशी सामना करीत पुन्हा उभे राहणे आहे. या साऱ्या सांगण्यातले नाट्य उभे करणारा निवेदक संयतपणे, समंजसपणे खेड्याकडे पाहतो. स्वतःला प्रकट करताना अहिराणी प्रदेशातील संस्कृतिरूपांना 'स्व'मध्ये सामावून घेतो. मुले माणसे, प्राणी, शेती- माती या सर्वामध्ये स्वतःला विसर्जित करतो. सर्जनशीलतेचा देशी प्रत्यय देतो. हे लेखन वाचल्यावर हे सारे सांगण्यालायक, सांगण्यासारखे आणि ऐकण्यासारखे आहे. अहिराणी भाषेचे पांग फेडणारे हे पहिलेच समर्थ व स्वाभाविक गद्य आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Dr. Dilip Dhondage

डॉ. दिलीप धोंडगे | Dr. Dilip Dhondage

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like