झूल

Zool

प्रकाशक
Popular Prakashan
भाषा
मराठी

₹४५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

चांगदेव चतुष्टय : ४ झूल भालचंद्र नेमाडे "बिढार', 'हुल', 'जरीला' आणि 'झूल' ही चांगदेवाच्या व्यक्तित्वाच्या विविध अंगांची आणि त्याला झुंज द्यावी लागतेय त्या जीवनाच्या तळपापुद्रयाची चित्रे आहेत. ही मालिका लक्षात न घेतली तरीही 'झूल'ला वेग‌ळे अस्तित्व आहे. संपूर्ण कादंबरी वाचल्यावर या जीवनाच्या नसतेपणाचा येणारा प्रत्यय हा टोकदार आहे आणि विचार करायला लावणारा आहे. बैलासारखं ओझी वाहणंच माणसाच्या पदरी पदोपदी येत, पण त्यासाठी तत्त्वज्ञानाची, विचाराची नवनवी झूल पांघरावी लागली तरी आतलं कातडं तेच असतं, पराणी टोचवून घेणाऱ्या बैलाचं । ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे ती अनेक थरांतून समाजाच्या एका तुकड्यालाच जणू जिवंत करीत जाते. चांगदेवबरोबर त्याच्या भोवतालचं तितकंच वास्तव आणि व्यवहारी जगही साकारण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत त्या सगळ्याच माणसांच्या आयुष्याला त्यांच्या अडचणी आणि वेदना ह्यांच्याशी झगडता झगडता एकप्रकारची सुंदर वीण लाभलेली आहे. ह्या कादाबरीनं कादंबरी ह्या प्रकारालाच काहीतरी नवं दिलंय आणि ते म्हणजे वैचारिकतेचौ मनमोहक चौकट आणि नव्या जीवनाचं तळदर्शन ! पण तितकंच जुन्या परंपरेपासून हिरावून घेतलीय कादंबरीची बांधेसूदता ! ह्याच कादंबरीबद्दल बोलायचं तर चित्रणाचा विस्कळीतपणा हा विस्कळीत जीवनाचंद दर्शन घडविणारी कादंबरी म्हणून इथे गुणवत भासतो आहे. वैचारिक संघर्ष, रोजच्या जीवनातील संघर्ष आणि अंतर्मनाचा बाह्य जगाशी चालणारा संघर्ष अशा विविध पातळीवरील संघर्ष वाचकांपर्यंत पोचविण्यात लेखक निश्चितच यशस्वी झालेला आहे. कादंबरीची भाषाही संभाषणाला 'अनुकूल' अशी म्हणूनच यशात भर टाकणारी ठरली आहे. ह्या कादंबरीमुळे पुढच्या कादंबरीकडे सुजाण वाचकांचे लक्ष लागून राहिले तर त्यात काय आश्चर्य ? आशा सावदेकर पूर्वप्रसिद्धी: 'युगवाणी', डिसेंबर-जानेवारी १९८१ चांगदेव चतुष्टयासंबंधी, संपा. राजन गवस, २००१
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे | Bhalchandra Nemade

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like