द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ

The Subtle Art Of Not Giving A F

प्रकाशक
Madhushree Publication
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सध्याच्या पिढीला खडबडवून जागं करणाऱ्या सेल्फ हेल्प गाइडमध्ये मार्क मॅन्सन हा स्टार ब्लॉगर आपल्याला आनंदी होण्याचा आणि खंबीर आयुष्य जगण्याचा मूलमंत्र सांगतो. तो मूलमंत्र आहे: प्रतिकूल परिस्थितीला नेटाने तोंड देता येणं आणि सदासर्वकाळ 'सकारात्मक' राहण्याचा प्रयत्न सोडणं. मार्क मॅन्सनचा ब्लॉग गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्या ब्लॉगमध्ये त्याने आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल ज्या अवास्तव अपेक्षा असतात, त्या खरंच किती अवास्तव असतात हे त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे हेच नुस्खे आणि तंत्र आता त्याने पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहेत. मनुष्य आहे तर तो चुका करणारच आणि त्याच्यात उणीवा असणारच या पायावरच मॅन्सनचा पूर्ण युक्तिवाद उभा आहे. तो म्हणतो, "सगळेच खास कसे असणार? कोणी एक जिंकत असेल, तर हरणाराही कोणीतरी असेलच ना? मला माहितिये, की हा विचार तुम्हाला आवडलेला नाही आणि त्यात तुमची चूकही नाही." मॅन्सन आपल्याला आपल्या मर्यादा जाणून घ्यायचा आणि त्या मान्य करण्याचा सल्ला देतो. त्यानेच तुमचं भलं होऊ शकेल असं तो म्हणतो. आपल्याला एकदा का आपल्या भीती, उणीवा, दोष आणि अनिश्चितता यांना पार करून पुढे जाता आलं, आपण त्यांच्यापासून पळ काढण्याचा किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न थांबवला आणि आपण आपल्या आयुष्यातील कटू सत्यांना जिगरबाजपणे सामोरे जायला शिकलो, की आपल्यात आपोआपच आयुष्य जगण्याचं बळ आणि आत्मविश्वास येतो. आपल्याला एकच आयुष्य मिळालं आहे, त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टी कमीच ठेवायला शिकलं पाहिजे. आता त्या गोष्टी कोणत्या, याची निवड जाणीवपूर्वक आणि नीट विचार करून झाली पाहिजे. मॅन्सनच्या या जरा-इथे-समोर-बस-आणि-माझ्याकडे-बघ-मला-तुझ्याशी-बोलायचंय पद्धतीच्या लिखाणात विस्मित करणाऱ्या अनेक घटना आहेत, अरे। हे काय। असं म्हणायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचं लिखाण कोणीतरी थोबाडावर थंड पाण्याचा हबकारा मारावा आणि खडबडून जाग करावं असं वाटतं, पण ते तुम्हाला आयुष्य अधिक समाधानाने जगायचंही बळ देतं.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

मार्क मॅन्सन | Mark Manson

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like