About this book
डॉ. प्रभाकर कुंटे हे स्वतः कांही शास्त्रीय पुस्तकांचे लेखक आहेत. "ताऱ्यांचे अंतरंग" हा श्री. विमन बसू ह्यांच्या "INSIDE STARS" पुस्तकाचा मराठीत अनुवाद आहे. ताऱ्यांचे अंतरंग कसे असते याचे वर्णन अतिशय सोप्या भाषेत डॉ. कुंटे यांनी केले आहे ते सर्वांनाच समजू शकेल. ताऱ्यांचा जन्म, त्यांची कोट्यावधी वर्षांची वाटचाल, उर्जेचे प्रक्षेपण आणि त्यांचा अंत हे सर्व मानवाच्या एकंदर जीवनाशी बरेच निगडीत दिसते. मानवाचाही जन्म होणे, त्याची जीवनाची वाटचाल, अन्न सेवन व उर्जा प्रक्षेपण आणि शेवटी अंत हा क्रम तसाच दिसतो. डॉ. प्रभाकर कुंटे हे मुंबईच्या 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च" ह्या संस्थेत खगोलविज्ञान विषयांत संशोधन करीत होते. त्यांनी शास्त्रीय विषयावरील अनेक लेख लिहिले असून त्यांची ९ पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या "धूमकेतूची स्वारी" ह्या पुस्तकास १९८६ मध्ये तर "डॉ. सी. व्ही. रामन" ह्या पुस्तकास १९९७ मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ. कुंटे ह्यांना "गुरुत्वाकर्षणीय भिंगाची प्रदर्शनात्मक प्रतिकृती" (Model) तयार केल्याबद्दल राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारही १९८४ मध्ये दिला गेला आहे.
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.