१९८४ जॉर्ज ऑर्वेल

1984 Jorge Orwell

प्रकाशक
Madhushree Publication
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जॉर्ज ऑर्वेलने भविष्याचं चित्र रेखाटणारी १९८४ ही कांदबरी १९४८ मध्ये लिहिली होती. ही कादंबरी मी २०१९मध्ये वाचली. ऑर्वेलचा जन्म चंपारन जिल्ह्यात झाला. मी देखील त्याच जिल्ह्याचा आहे. पण मला त्याच्या बद्दल २०१९मध्ये अधिक जवळीक वाटते. कारण कादबरीचं कथानक आणि तपशील आज आपण ज्या जगात जगत आहोत, त्याचं अचूक प्रतिबिंब आहे. कादंबरीत सर्वत्र टेलिव्हिजनचे पडदे आहेत. जेणेकरून बिगब्रदर सामान्य नागरिकांवर पाळत ठेवतो. याच पडद्यांवरून बातम्याही त्याच वेळी प्रसारित होतात. हे आपल्याला ओळखीचं झालंय. आपले फोन आणि फोनचे स्क्रीन्स आपल्याला नियंत्रित करण्याची साधनं ठरली आहेत. आपल्याला कशाप्रकारे नियंत्रित केलं जातं आहे याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कमीत कमी काही शेकडो वृत्तवाहिन्या आज आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या घोषणा आणि दिल्या जाणाऱ्या बातम्या सारख्याच असतात. तथाकथित बातम्यांची ही व्यवस्था अहर्निश काम करत असते. जेणेकरून नागरिकांचं रुपांतर रोबोट वा यंत्रमानवामध्ये व्हावं. - रवीश कुमार पत्रकार, एन.डी.टी.व्ही. इडिया '१९८४' ही कादंबरी ऑर्वेलनं १९४८ साली लिहिली. 'अॅनिमल फार्म' प्रमाणे याही पुस्तकाची अनेक भाषांतरं झाली. भारतीय भाषांपैकी हिंदी आणि मराठीत तरी झाली आहेतच. इतरही असतील. व्यक्तींच्या एकूण एक अंगांवर नियंत्रण करू इच्छिणारी आणि असं करू शकणारी राज्यपद्धती... याची नुसती एक झलक म्हणून सांगतो, की एक पात्र या जगाचं प्रतीक म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर रोवलेली बुटांची टाच अशी प्रतिमा उभी करतो. हे एक सुटका नसलेलं, हादरवणारं दुःस्वप्न ऑवलनं उभं केलं आहे. नंदा खरे उत्कंठावर्धक रचना, सरळसोपी भाषाशैली, बोचरा उपरोध आणि वाचून संपल्यावर अस्वस्थ करणारे कथानक, उपहासिका, भविष्यकथन, राजकीय प्रबंध, विज्ञान काल्पनिका, गुप्तहेरकथा, मानसिक भयपट, प्रेमकथा अशा अनेक वर्गात चपखल बसणारी, कोणत्याही काळात आजची वाटणारी कादंबरी... वसंत आबाजी डहाके
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जॉर्ज ऑर्वेल | Jorge Orwell

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like