लाकडाची देवी

Lakdachi Devi

लेखक Sarika | सारिका
प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
१४२
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054142
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

स्त्री-पुरुष संबंधांमधील गुंतागुंत, पुरुषी अहंकार-स्वार्थ, पुरुषी व्यवस्थेतली स्त्रीची असीम फरफट, तिची मानसिक आंदोलनं आक्रंदनं आणि अंतिमतः स्त्रीच्या आत्मशोधाचा वेध घेणारा एक संवेदनशील, प्रगल्भ आणि आशयघन असा ऐवज म्हणजे सारिका यांचा 'लाकडाची देवी' हा कथासंग्रह. विशेषतः स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा बारकाईने अन्वय लावणाऱ्या मोजक्या कथासंग्रहांमध्ये मराठी कथासाहित्यात या संग्रहाचे एक लक्षणीय ठळक स्थान असू शकेल. 'स्त्रीवाद' हा शब्दही न उच्चारता यातल्या कथा त्या 'इझम'शी स्वतःचं नातं प्रस्थापित करत राहतात, हे या कथासंग्रहाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे.


यातील प्रत्येक कथा वाचकाला समाजातल्या स्त्री-विषयक क्रूरकोरड्या वर्तनव्यवहाराची आणि अनुषंगाने घडणाऱ्या स्त्रियांमधल्या मानसिक- भावनिक उलथापालथीची साक्ष देते. पुरुषप्रधान समाजातल्या दुटप्पी नीतीनियमांच्या चिरेबंदी चौकटीत चिणल्या जाणाऱ्या स्त्रिया सारिका यांनी अतिशय ताकदीने उभ्या केल्या आहेत. एका पुरुषाच्या आत्मनिवेदनातून येणारी 'पुरुष' सारखी कथा पुरुषाच्या सोयीनुसार वापरली जाणारी स्त्री आणि तिचं भरडलेपण तीव्र ठळकपणे समोर आणते. बालपणीच्या निरागस आठवणी, नकळत घडणारे लैंगिक शोषण, न बोलता येणाऱ्या वेदना आणि स्त्रीच्या मनात कायमची घर करून राहणारी भीती व आक्रोश यांचे दाहक मिश्रण संवेदनशीलतेने आणि तितक्याच तीव्रतेने काही कथांमधून समोर येते. 'परेड सावधान' सारखी एखादी कथा वाचकांना एका बिदीर्ण मानसिक अवस्थेत घेऊन जाते. वरवर एकदम कणखर आणि स्वयंनिर्भर दिसणाऱ्या स्त्रियांच्या आतला एकाकीपणा, अगतिकता आणि वैवाहिक सामाजिक आयुष्यातला कोरडेपणा लेखिकेने अत्यंत नीटसपणे टिपला आहे. स्त्रीच्या या बाह्य बंडखोर कणखरतेमागे लपलेली तिची नाजूक, कोमल आणि प्रेमासाठी आसुसलेली बाजू ही कथा ताकदीने समोर आणते.


सारिका यांची भाषा ओघवती, कसलीही भाषिक सजावट नसलेली आणि वास्तवाला थेट भिडणारी आहे. व्यक्तिरेखांचा त्यांनी घेतलेला वेध नातेसंबंधांतील व्यामिश्र पदरांची इतक्या सूक्ष्मपणे उकल करणारा आहे की वाचक नकळत त्यातल्या बेदनांशी एकरूप होऊन जातो.


'लाकडाची देवी' हा फक्त घटकाभर मनोरंजनासाठी वाचावा असा कथासंग्रह नाही. तो स्त्रीच्या अस्तित्वाचा, सोशिकतेचा, आत्मभानाच्या शोधाचा आणि तिच्या आतआतल्या संघर्षाचा शोध घेणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. मराठी कथाविश्वात या कथेची स्वतःची एक निर्भीड ओळख निर्माण होईल, हे नक्की.


बालाजी सुतार.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

लाकडाची देवी — highlight लाकडाची देवी — highlight लाकडाची देवी — highlight लाकडाची देवी — highlight लाकडाची देवी — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like