About this book
या पुस्तकाविषयी
साध्या, सुंदर, मितव्ययी शब्दांची कविता विनायक पाटील यांची आहे. त्या कवितेला शब्दांचा सोस नको वाटतो, तसा पाल्हाळसुध्दा नको असतो. छोट्याशा आपल्या अनुभवाचं लहानसं घर करून ती कविता आपल्याला सुखावून टाकते. - ना. धों. महानोर ही कविता अटकर बांध्याची आहे. एैसपैस फापटपसारा ती टाळते. चारसहा ओळीत अनुभवांचे मर्म, भावनांचा उद्रेक, विचारांचा टोकदारपणा वाचकाच्या प्रत्ययाला आणून देण्याचे तिचे सामर्थ्य लक्षणीय आहे. आविष्कारात कसलाही आक्रस्ताळेपणा नाही. जीवनातील दुःख- दैन्याविषयीचा कंठाळी आक्रोश नाही. 'विद्रोहा' ची प्रचलित आवेशी वाणी नाही. जे काही सांगायचे आहे ते अगदी मोजक्या शब्दांत सांगत आपल्या हृदयाच्या सतारीच्या तारा झंकारीत ती जाते. - पुरुषोत्तम पाटील
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं